इंडिगोनंतर एअर इंडियाचा प्रॉब्लेम! फ्लाइटला तब्बल ६ तास उशीर, भडकली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:55 IST2025-12-16T16:55:36+5:302025-12-16T16:55:58+5:30
सोनाक्षी ज्या विमानाने प्रवास करणार होती त्या एअर इंडियाच्या विमानाने तब्बल ६ तास उशिरा उड्डाण केलं. याबाबत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

इंडिगोनंतर एअर इंडियाचा प्रॉब्लेम! फ्लाइटला तब्बल ६ तास उशीर, भडकली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. सोनाक्षीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स सोनाक्षी चाहत्यांना सोशल मीडियावरुन देत असते. नुकतंच सोनाक्षीने शेअर केलेल्या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाक्षी ज्या विमानाने प्रवास करणार होती त्या एअर इंडियाच्या विमानाने तब्बल ६ तास उशिरा उड्डाण केलं. याबाबत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत 'हेट यू एअर इंडिया' असं म्हटलं होतं. "५ वाजताच्या फ्लाइटसाठी ४ वाजल्यापासून विमानतळावर होते. एक एक तास पुढे करत काहीही कारण नसताना विमान चक्क ११ वाजता उडालं", असंही तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं. ६ तास फ्लाइटला उशीर झाल्याने सोनाक्षी भडकली आणि तिने पोस्ट शेअर केली होती. मात्र नंतर तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.

दरम्यान, सोनाक्षीने २०१० मध्ये दबंग सिनेमातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर सन ऑफ सरदार, राऊडी राठोड, हॉलिडे, मिशन मंगल, लुटेरा, हिंमतवाला, आर राजकुमार यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तर दहाड, हिरामंडी या वेब सीरीजमध्येही सोनाक्षी झळकली आहे.