सोनाक्षी सिन्हाने शेअर केला लग्नातील BTS व्हिडीओ, पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:28 IST2024-12-05T17:24:50+5:302024-12-05T17:28:17+5:30
सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नातील BTS व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनाक्षी सिन्हाने शेअर केला लग्नातील BTS व्हिडीओ, पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. आताही अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधू घेतलं आहे. सोनाक्षीने लग्नातील एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
सोनाक्षी सिन्हा ही तिच्या यूट्यूब चॅनलवर विविध व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने तिच्या लग्नात झालेल्या एक गडबडीचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात सोनाक्षी ही फुलांच्या चादरीखाली एन्ट्री करताना दिसतेय. पण, ही फुलांची चादर इतकी जास्त वजनदार होती की, तिला उचलणे तिच्या मित्रांना कठीण जात होते. शिवाय, दरवाजामधून ती कशीतरी नेण्याचा प्रयत्न करताना तिचे मित्र दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी हसताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाला 5 महिने झाले आहेत. 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी 23 जून रोजी लग्न केले होतं. दोघांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत लग्न केलं. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचं झालं तर 'Nikita Roy and the Book of Darkness' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसोबत अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहेल नय्यर यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्येही सोनाक्षी दिसणार आहे.