'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:18 IST2025-08-02T12:18:07+5:302025-08-02T12:18:55+5:30

Son Of Sardar 2 Movie And Dhadak 2 Movie: 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' पैकी कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जास्त कमाई केली आहे ते जाणून घ्या.

'Son of Sardaar 2' beats 'Dhadak 2', collects so many crores, know the collection of 'Saiyaar' | 'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन

'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन

बॉक्स ऑफिसवर अहान पांडे (Ahan Panday) आणि अनिता पड्डा (Anita Padda) यांच्या 'सैयारा' (Saiyaara Movie) या चित्रपटाच्या धुमाकूळात अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2 Movie) हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्यात मृणाल ठाकूर आणि रवी किशन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. त्याचवेळी, सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक २' (Dhadak 2 Movie) हा चित्रपटही थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांशी भिडले आहेत. 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २' पैकी कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी जास्त कमाई केली आहे ते जाणून घ्या.

विजय कुमार अरोरा दिग्दर्शित 'सन ऑफ सरदार २'ला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट पूर्णपणे विनोदी आणि मनोरंजक आहे. त्याचे बॉक्स ऑफिस अकाउंट एका अंकात उघडले आहे. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ६.७५ कोटी रुपये कमावले आहेत. मात्र, हा एक प्रारंभिक अंदाज आहे. अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात.

'सन ऑफ सरदार २'नं 'धडक २'ला टाकलं मागे
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा 'धडक २' हा एक रोमँटिक चित्रपट आहे. त्यात प्रेम, इमोशन आणि ड्रामा सर्वकाही आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार, 'धडक २' ला भारतात ३.३५ कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली आहे. अशाप्रकारे, अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' ने पहिल्याच दिवशी 'धडक २'ला मागे टाकले आहे. हा चित्रपट साजिया इक्बाल दिग्दर्शित आहे.

'सैयारा' ३०० कोटी क्लबकडे करतोय वाटचाल
अहान पांडे आणि अनिता पड्डा यांच्या 'सैयारा' हा चित्रपट लवकरच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने १५ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी भारतात ४.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'सैयारा'ने आतापर्यंत भारतात २८४.७५ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Web Title: 'Son of Sardaar 2' beats 'Dhadak 2', collects so many crores, know the collection of 'Saiyaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.