काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:28 IST2020-01-06T16:21:30+5:302020-01-06T16:28:42+5:30
तुमच्या या आवडत्या अभिनेत्री मेकअपशिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअशिवाय ओळखणे देखील कठीण जाते.

काही अभिनेत्री मेकअपशिवाय दिसतात अतिशय भयानक तर काही आहेत रिअल ब्यूटी, पाहा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री स्क्रिनवर खूपच छान दिसतात. त्यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून त्यांचे फॅन्स त्यांच्या प्रेमात पडतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या या आवडत्या अभिनेत्री मेकअपशिवाय खूपच वेगळ्या दिसतात. काही अभिनेत्रींना तर मेकअशिवाय ओळखणे देखील कठीण जाते.
राणी मुखर्जी
राणी मुखर्जीने बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले असून तिचा मर्दानी 2 हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. राणी खऱ्या आयुष्यात मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते.
कतरिना कैफ
कतरिना कैफला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा केली जाते. कतरिना मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसते.
प्रियंका चोप्रा
प्रियंका स्क्रिनवर खूपच छान दिसत असली तरी ती मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. तिचे मेकअपशिवाय फोटो पाहिल्यास तिच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसतो.
काजोल
काजोलला अनेकवेळा मेकअपशिवाय सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते. ती मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते.
आलिया मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसते.
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरला मेकअपशिवाय पाहिलं तरी ती रिअल ब्यूटी आहे असेच तुम्ही म्हणाल...
दीपिका पादुकोण
दीपिका मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. तिच्या मॉडलिंग दिवसातील फोटो पाहिल्यास तिला ओळखणे देखील कठीण जाते.
अमिषा पटेल
अमिषाचा मेकअप लूक आणि मेकअपशिवायचा लूक खूपच वेगळा असून मेकअपशिवाय तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यास तिला अनेकवेळा ट्रोल केले जाते.
करिना कपूर
करिना कपूर मेकअपशिवाय देखील तितकीच सुंदर दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे नेहमीच म्हणणे असते.