अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’साठी मिळाली हिरोईन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 17:30 IST2019-03-03T17:30:00+5:302019-03-03T17:30:01+5:30
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. होय, अक्षय कुमार लवकरच साऊथचा सुपरहिट सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक घेऊन येतोय. या हिंदी रिमेकचे नाव असेल ‘लक्ष्मी’.

अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’साठी मिळाली हिरोईन!!
ठळक मुद्देशोभिता याआधी सैफ अली खानसोबत ‘शेफ’मध्ये दिसली होती.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. होय, अक्षय कुमार लवकरच साऊथचा सुपरहिट सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक घेऊन येतोय. या हिंदी रिमेकचे नाव असेल ‘लक्ष्मी’. अक्षय कुमारला ‘कंचना’ची स्क्रिप्ट आवडली होती आणि त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी त्याने होकार दिला होता. अर्थात गेल्या वर्षभर अतिशय व्यग्र असल्यामुळे अक्षयचा हा रिमेक थंडबस्त्यात पडला. पण आता रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हातावेगळा करताच अक्षय या रिमेकचे काम सुरु करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात अक्षयच्या अपोझिट एका हिरोईनलाही साईन करण्यात आले आहे. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे शोभित धुलिपाला.
ताज्या बातमीनुसार,‘लक्ष्मी’च्या निर्मात्यांनी अक्षयच्या अपोझिट शोभिताला साईन केले आहे. शोभिता याआधी सैफ अली खानसोबत ‘शेफ’मध्ये दिसली होती. लवकरच शोभिता ‘बार्ड आॅफ ब्लड’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शबीना खान आणि तूषार कपूर ‘लक्ष्मी’ प्रोड्यूस करणार आहेत. राघव लॉरेन्स या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. राघव यांनीच ‘कंचना’चे दिग्दर्शन केले होते. या वर्षाअखेरिस ‘लक्ष्मी’चे शूटींग सुरु होईल. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी चित्रपट असेल.
अक्षयने २००७ साली ‘भूल भूलइया’ या हॉरर कॉमेडीपटात काम केले होते. यानंतर तब्बल १२ वर्षांनी अक्षय हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. तूर्तास अक्षय ‘गुड न्यूज’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. लवकरच त्याचा ‘केसरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.