आधी स्मृती-पलाशनं एकमेकांना केलं अनफॉलो, आता भावाचं लग्न मोडल्यावर पलकनं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:27 IST2025-12-08T14:25:39+5:302025-12-08T14:27:32+5:30
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडल्याची घोषणा करताच दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

आधी स्मृती-पलाशनं एकमेकांना केलं अनफॉलो, आता भावाचं लग्न मोडल्यावर पलकनं घेतला मोठा निर्णय
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं २३ नोव्हेंबरला लग्न होणार होतं. पण, अचानक ट्विस्ट आला आणि लग्नसोहळा थांबला. लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना लग्नाच्या दिवशी अचानक आजारी पडले, ज्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं कारण सांगण्यात आलं. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. काही चॅट्सदेखील व्हायरल झाले, ज्यात पलाश मुच्छलने स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला. या चर्चांमध्ये काल स्मृतीने इन्स्टावरील स्टोरीच्या माध्यमातून हे लग्न रद्द झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर हे प्रकरण येथेच संपवून पुढे जाण्याची वेळ आल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. यानंतर पलाशनेही आपले नाते संपुष्टात आल्याची कबुली दिली. दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केलंय. यातच आता पलाश मुच्छलची बहिण आणि लोकप्रिय गायिका पलक मुच्छलनेही मोठा निर्णय घेतला आहे.
लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर स्मृतीनं पलाशला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं. तिने पलाशसोबतचे तिचे काही फोटो आणि लग्नातील कंटेंट देखील डिलीट केले. पलाशने स्मृतीला त्याच्या इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं, त्यानेही स्मृतीबरोबरचे काही फोटो डिलीट केले. स्मृती आणि पलाश यांनी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यावर पलक मुच्छलनेही स्मृतीला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. तसेच तिनं स्मृतीबरोबरचे फोटो आपल्या पेजवरुन हटवले.
दरम्यान, स्मृती आणि पलाश यांची भेट २०१९ साली झाली होती. दोघे मुंबईत एका मित्राच्या माध्यमातून भेटले होते. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली, जी प्रेमात बदलली. दोघांनी आपले नाते शांतपणे पुढे नेले. सुरूवातीचे काही दिवस या दोघांनी त्यांचे नाते सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले होते. पण, स्मृतीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे नेतृत्व करत WPL मध्ये पहिला विजय मिळवल्यानंतर, पलाशने त्याचा स्मृतीबरोबर WPL ट्रॉफी घेऊन उभा असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.