मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती
By ऋचा वझे | Updated: July 2, 2025 21:45 IST2025-07-02T20:17:06+5:302025-07-02T21:45:31+5:30
अमृता फडणवीस यांच्या पुढाकारातून दिव्य फाऊंडेशनच्या वतीने विशेष मुलांसाठी 'सितारे जमीन पर'चं स्क्रीनिंग...

मुख्यमंत्र्यांनी विशेष मुलांसोबत पाहिला 'सितारे जमीन पर'; अमृता फडणवीस, आमिर खान यांचीही उपस्थिती
अभिनेता आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा सध्या खूप गाजत आहे. विशेष मुलांवर आधारित हा सिनेमा आहे. यानिमित्त अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आज मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये विशेष मुलांसाठी (Specially Abled) 'सितारे जमीन पर' सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवलं. दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही उपस्थिती होती. तसंच अभिनेता आमिर खाननेही हजेरी लावली.
दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'सितारे जमीन पर' च्या स्क्रीनिंगला मुंबईतील १५ शाळांमधील विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना बोलवण्यात आलं होतं. या सर्व मुलांनी पालकांसोबत सिनेमाचा आनंद लुटला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत सिनेमा पाहण्यासाठी बसले होते. सोबत अमृता फडणवीस आणि आमिर खानही होते. त्यामुळे या मुलांचा आनंद द्विगुणीत झाला. जवळपास ३०० मुलांनी सिनेमा पाहिला.
सिनेमा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले, " आमिर खान यांनी अतिशय चांगला सिनेमा तयार केला आहे. विशेषत: स्पेशली एबल्ड मुलांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या मुलांमधील विशेष क्षमता समाजासमोर आणणारा हा सिनेमा आहे. या मुलांचे कुटुंब, शिक्षक त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांना समाजात उभं करण्याचा प्रयत्न करतात. समाजानेही त्यांच्याप्रती संवेदनशील असलं पाहिजे हे या सिनेमातून आपल्याला समजतं. म्हणून मी आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी हा सिनेमा बघितला पाहिजे."
🕡 6.21pm | 2-7-2025📍Mumbai.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 2, 2025
LIVE | Media Interaction #Maharashtra#Mumbaihttps://t.co/D6zy1Jp8E5
"आज या स्क्रीनिंगला जमनाबाई नरसी स्कुल आणि इतर शाळांमधील ३०० मुलं आली होती. सर्वांनी 'सितारे जमीन पर' चा आनंद घेतला. समाजाने या मुलांना आदर द्यावा ही शिकवण हा सिनेमा देतो. त्यासाठी आमिर खानचे आभार", अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.