बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:53 IST2024-10-07T13:52:42+5:302024-10-07T13:53:55+5:30
एकापेक्षा एक डायलॉग्स, थरारक अॅक्शनने भरलेला सिनेमाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' (Singham Again) सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ४ मिनिट ४५ सेकंद एवढा मोठा हा हिंदी सिनेमाच्या इतिहासातला पहिलाच ट्रेलर आहे. सिंघम अगेन अॅक्शन पॅक्ड सिनेमात अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांची भूमिका आहे. तर अक्षय कुमारचा कॅमिओ आहे. एकापेक्षा एक डायलॉग्स, थरारक अॅक्शनने भरलेला सिनेमाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
सिंघम अगेन सिनेमाची कथा रामायणाशी जोडलेली आहे. अजय देवगण आणि करीना कपूर हे पती पत्नी असून करीनाचा जीव वाचवण्यासाठी अजय देवगण म्हणजेच बाजीराव सिंघम लंका दहन करणार आहे. अर्जुन कपूरला कलियुगातला रावण दाखवण्यात आला आहे. तर दीपिका पदुकोण लेडी सिंघमच्या भूमिकेत भाव खाऊन जात आहे. रणवीर सिंह सिंबाच्या भूमिकेत असून तो बाजीराव सिंघमचा भक्त म्हणजेच हनुमान साकारत आहे. तर टायगर श्रॉफ बाजीराव सिंघमचा चाहताच असून पोलिसाच्याच भूमिकेत आहे. ट्रेलरच्या शेवटी हेलिकॉप्टरमधून अक्षय कुमारची म्हणजेच सूर्यवंशी ची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. एकूणच ४ मिनिट ४५ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व पात्रांची ओळख करुन देण्यात आली आहे. सिनेमात दिग्दर्शक रोहित शेट्टी स्टाईल फुल अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
'सिंघम अगेन' दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. आज सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा ग्रँड पद्धतीने पार पडला. या सोहळ्यात रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, टायगर श्रॉफ, रवी किशन हे हजर होते. दीपिका पदुकोण नुकतीच आई झाली असल्याने ती ट्रेलर लाँचला येऊ शकली नाही.