५२ व्या वाढदिवशी सोनू निगमने व्यक्त 'ही' इच्छा, म्हणाला "मला एकट्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:08 IST2025-07-30T18:07:05+5:302025-07-30T18:08:10+5:30
सोनू निगमची इच्छा काय आहे?

५२ व्या वाढदिवशी सोनू निगमने व्यक्त 'ही' इच्छा, म्हणाला "मला एकट्याने..."
सोनू निगम हा बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. संगीत श्रेत्रातील अमूल्य योगदानामुळे सोनू निगमला पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सोनू निगमचा आज ३० जुलै रोजी ५२ वाढदिवस आहे. या दिवशी सोनू निगमनं एक खास इच्छा व्यक्त केली आहे.
सोनु निगमनं नुकतंच वाढदिवसानिमित्त एएनआयशी संवाद साधला. या दरम्यान त्याने आपली इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, "प्रत्येक व्यक्तीच्या जीवन प्रवासात अध्यात्म समाविष्ट असले पाहिजे. मला जीवनाकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत आणि माझ्याकडे कोणत्याही योजनाही नाहीत. मी आज माझ्या आयुष्याबद्दल खूप आनंदी आहे. माझी एक इच्छा आहे की मला डोंगरांमध्ये एकटा वेळ घालवायचा आहे. जर मी निरोगी असेन तर मला स्वतःसोबत जास्त वेळ घालवायचा आहे".
सोनू निगमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आज त्याचे 'परदेसिया' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याचे हे गाणे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्टारर बहुप्रतिक्षीत रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'परम सुंदरी'(Param Sundari Movie) मधील आहे. या रोमँटिक गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि ते सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 'परम सुंदरी' हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.