Video: "बाहेर जा नाहीतर.."; भर कॉन्सर्टमध्ये सोनू निगमचा संताप, प्रेक्षकांना फटकारलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:42 IST2025-02-10T14:40:52+5:302025-02-10T14:42:29+5:30
सोनू निगमने एका कॉन्सर्टमध्ये उपस्थित प्रेक्षकांना चांगलंच सुनावलं. काय घडलं नेमकं? (sonu nigam)

Video: "बाहेर जा नाहीतर.."; भर कॉन्सर्टमध्ये सोनू निगमचा संताप, प्रेक्षकांना फटकारलं; नेमकं काय घडलं?
लोकप्रिय गायक सोनू निगम (sonu nigam) हा बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत असतो. सोनू निगमचा एका कॉन्सर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत भर कॉन्सर्टमध्ये सोनू निगम माइकवर त्याचा राग व्यक्त करताना दिसतोय. "खाली बस नाहीतर बाहेर निघून जा", अशा शब्दात सोनू निगम कॉन्सर्टमध्ये आलेल्या प्रेक्षकांना सुनावताना दिसतोय. काय घडलंय सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये?
सोनू निगमचा राग अनावर कारण...
सोशल मीडियावर सोनू निगमचा एक व्हिडीओ पाहायला मिळतोय. या व्हिडीओत तो कॉन्सर्टमध्ये गाण्याची तयारी करताना दिसतोय. पुढे स्टेजवरच सोनू माइक हातात घेऊन उपस्थित प्रेक्षकांपैकी काही जणांवर वैतागलेला दिसतोय. तो म्हणतो की, "तुला जर उभंच राहायचं असेल तर निवडणुकीत उभं राहा. कृपया लवकरात लवकर बसून घ्या. किती वेळ जातोय माझा तुला माहित आहे? लवकर बसा नाहीतर बाहेर जा. ही जागा रिकामी करा." अशा शब्दात चालू कॉन्सर्टमध्ये सोनू निगमने प्रेक्षकांना फटकारलं.
सोनू निगमने केलं राष्ट्रपती भवनात सादरीकरण
अलीकडेच सोनू निगमने राष्ट्रपती भवन दिवसाचंं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. इतकंच नव्हे राष्ट्रपतींसमोर विकीने लाइव्ह परफॉर्मन्सही केला. सोनू निगम सध्या विविध बॉलिवूड आणि मराठी गाण्यांसाठी त्याच्या स्वरांचा साज चढवत आहे. जानेवारी २०२५ मध्ये रिलीज झालेला संगीत मानापमान सिनेमातील सोनू निगमने गायलेलं 'चंद्रिका' गाणं चांगलंच लोकप्रिय झालं. सोनू निगमने गायलेली अनेक मराठी आणि हिंदी गाणी चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत.