श्रेया घोषाल झाली वरळीकर! बाबांसह खरेदी केला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:51 IST2026-04-06T13:46:35+5:302026-04-06T13:51:20+5:30
shreya ghoshal buy new home: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका श्रेया घोषाल सध्या चर्चेत आली आहे. श्रेयाने मुंबईतील वरळी परिसरात एक अत्यंत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे

श्रेया घोषाल झाली वरळीकर! बाबांसह खरेदी केला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून चक्रावून जाल
भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) सध्या चर्चेत आली आहे. श्रेयाने मुंबईतील वरळी परिसरात एक अत्यंत आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या घराची किंमत तब्बल २९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रेयाने वडिल बिस्वजीत घोषाल यांच्यासह हे घर खरेदी केलं आहे. श्रेयाच्या घराची किंमत ऐकून सर्वजण चक्रावले आहेत. जाणून घ्या सविस्तर
वरळीतील टॉवरमध्ये नवे घर
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया घोषालने हे नवीन घर वरळीतील गोदरेज ट्रिलॉजी इमारतीमध्ये घेतेले आहे. हे घर सुमारे २४३०.०६ स्क्वेअर फूट पेक्षा जास्त जागेचं असून, त्यातून वरळीतील समुद्राचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. या इमारतीत अनेक जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. श्रेयाने या घरासाठी कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे. घरासोबत श्रेयाला पार्किंगसाठी वेगळी जागाही मिळाली आहे. श्रेयाच्या घराची २९.७० कोटी रुपये किंमत ऐकून सर्वजण चक्रावले आहेत.
गायिका श्रेया घोषालने आपल्या मधुर आवाजाने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. केवळ हिंदीच नाही, तर मराठी, बंगाली, तमिळ आणि तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये तिने सुपरहिट गाणी गायली आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर आता श्रेयाने वडिलांसह मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी घर खरेदी केल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय.
वरळी हा परिसर सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांसाठी पसंतीचे ठिकाण बनला आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची घरे याच परिसरात आहेत. आता श्रेया घोषाल देखील यात सामील झाली आहे.