डिम्पलची बहिण सिंपल कपाडिया सिनेमात ठरली फ्लॉप, मात्र या क्षेत्रात चमकलं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 16:08 IST2022-02-12T15:59:10+5:302022-02-12T16:08:03+5:30
Simple Kapadia Life Facts: ‘अनुरोध’ या चित्रपटातून सिम्पलने फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

डिम्पलची बहिण सिंपल कपाडिया सिनेमात ठरली फ्लॉप, मात्र या क्षेत्रात चमकलं नशीब
Simple Kapadia Life Facts: अभिनेत्री डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) आज इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. 'बॉबी' चित्रपटातून ग्लॅमर इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री घेतली. डिम्पल आणखी एका कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आली आणि ते कारण म्हणजे भारताचा पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी झालेला तिचा विवाह. ही गोष्ट होती डिंपल कपाडियाची पण तुम्हाला माहिती आहे का की डिंपलला सिंपल कपाडिया(Simple Kapadia) नावाची बहीण देखील होती.
‘अनुरोध’ या चित्रपटातून सिम्पलने फिल्मी करिअरची सुरुवात केली. यात तिचा को-स्टार होता राजेश खन्ना. होय, राजेश खन्ना यांचे डिम्पलसोबत लग्न झाले होते. बहिणीच्या नव-यासोबत पडद्यावर रोमान्स करणे सिम्पलसाठी सोपे नव्हते. कसा बसा हा सिनेमा पूर्ण झाला. अर्थात फ्लॉपही झाला.
यानंतर तिच्या वाट्याला आणखी काही चित्रपट आलेत. पण यात ती सहाय्यक अभिनेत्री म्हणूनच दिसली. आयुष्याची 10 वर्षे तिने अॅक्टिंग करिअर सावरण्यात घालवलीत. पण अखेरपर्यंत बहीण डिम्पल कपाडियासारखे यश तिला मिळवता आले नाही.
अॅक्टिंगमध्ये टिकाव लागणार नाही, हे कळताच सिम्पलने डिझाईनिंग क्षेत्राकडे मोर्चा वळवला आणि कॉस्च्युम डिझाईन करायला सुरुवात केली. रूदाली, रोक सको तो रोक लो, शहीद यासारख्या चित्रपटांसाठी तिने कॉस्च्युम डिझाईन केलेत. विशेष म्हणजे, रूदालीसाठी तिला बेस्ट कॉस्च्युम डिझायनरचा नॅशनल अवार्डही मिळाला. चित्रपटांशिवाय सिम्पलने तब्बू, प्रियंका चोप्रा, श्रीदेवी या मोठ्या हिरोईनसाठीही कपडे डिझाईन केलेत. एक डिझायनर म्हणून सिम्पलचे करिअर मार्गी लागले आणि नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
कॉस्च्युम डिझायनर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली असतानाच अचानक सिम्पलला कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि एक दिवस सिम्पलने जगाचा निरोप घेतला.