अखेर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला,‘अफवांना आम्ही टाळू शकत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:16 IST2020-02-09T18:16:21+5:302020-02-09T18:16:43+5:30
अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. विकीच्या चित्रपटातील दमदार अभिनयाचीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा सर्वत्र असते.

अखेर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला,‘अफवांना आम्ही टाळू शकत नाही’
बॉलिवूड आणि गॉसिप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादी गोष्ट घडली आणि त्याची चर्चा झाली नाही, असे होणारच नाही. आता हेच बघा ना, अलीकडेच विकी कौशल ‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता विकी कौशल लाखो तरुणींच्या मनावर राज्य करत आहे. विकीच्या चित्रपटातील दमदार अभिनयाचीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा सर्वत्र असते. गर्लफ्रेंड हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विकी अभिनेत्री कतरिना कैफला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये या दोघांना एकत्र पाहिल्याने अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर अखेर विकी कौशलने मौन सोडलं आहे. ‘मला स्पष्टीकरण द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. माझ्या खासगी आयुष्याबाबत तुम्हाला सर्वकाही माहित आहे आणि खोटं बोलायची मला सवय नाही’, असं म्हणत विकीने कॅटरिनासोबत रिलेशनशिपमध्ये नसल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कॅटरिनानेही विकीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. ‘अफवा या सेलिब्रिटींच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतात. त्यांना आम्ही टाळू शकत नाही’, असं ती म्हणाली होती.
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विकी आणि डान्सर हरलीन सेठी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. मात्र कतरिनामुळे या दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं जातं.