सिद्धू मूसेवालाचा धाकटा भाऊ आहे खूपच क्यूट! Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:27 IST2025-03-07T14:27:07+5:302025-03-07T14:27:56+5:30
नेटकऱ्यांनी सिद्धू मुसेवालाच्या भावावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सिद्धू मूसेवालाचा धाकटा भाऊ आहे खूपच क्यूट! Video Viral
Sidhu Moosewala: लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moosewala) २९ मे २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती. सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जगण्यासाठी काहीच कारण उरले नाही, अशी त्यांची अवस्था झाली होती. अखेर आयव्हीएफ(IVF)च्या माध्यमातून पुन्हा आईवडील होण्याचा निर्णय घेतला. १७ मार्च २०२३ रोजी त्यांना मुलगा झाला. त्याच्या रुपाने सिद्धूच परत आल्याचं सर्वांना वाटलं. सिद्धूचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर यांनी आपल्या दुसऱ्या लेकाचं नाव शुभदीप असं ठेवलं आहे. आता नुकतंच शुभदीपचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
सिद्धू मूसेवालाचा धाकटा भाऊ शुभदीपचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुबगुबीत गाल, डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर निरागसता पाहायला मिळतेय. शुभदीप हा ट्रॅक्टरवर बसलेला असून वडील बलकौर सिद्धू त्याला धरून आहेत. तो हसताना आणि खेळताना पाहायला मिळतोय. या गोंडस बाळाला पाहून सिद्धूचे चाहते खूप खुश झाले आहेत. नेटकऱ्यांनी सिद्धू मुसेवालाच्या भावावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
सिद्धूच्या निधनाला येत्या २९ मे रोजी तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. त्याची गाणी चाहते आवडीने ऐकतात. सिद्धूची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. यावरुन त्याच्या धाकट्या भावाचं नाव ठेवण्यात आलं आहे. छोटा शुभदीप हा गायक व्हावा, अशी इच्छा सिद्धूचे चाहते व्यक्त करत आहेत.