"आता आमचं आयुष्य बदलेल...", लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली पोस्ट, कोकण हार्टेड गर्ल कमेंट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:57 IST2025-07-16T10:56:37+5:302025-07-16T10:57:26+5:30
बाबा झाल्यानंतर सिद्धार्थचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

"आता आमचं आयुष्य बदलेल...", लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली पोस्ट, कोकण हार्टेड गर्ल कमेंट करत म्हणाली...
बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच आईबाबा झाले आहेत. मंगळवारी(१५ जुलै) कियाराने गोंडस लेकीला जन्म दिला. त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. घरी चिमुकल्या परीचं आगमन झाल्याने मल्होत्रा आणि अडवाणी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. बाबा झाल्यानंतर सिद्धार्थचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
सिद्धार्थने बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याची बातमी दिली आहे. "आमचं हृदय भरुन आलं आहे आणि आमचं आयुष्य बदललं आहे. आम्हाला कन्यारत्न झालं आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
सिद्धार्थ आणि कियाराने २०२३ मध्ये लग्न करत संसार थाटला. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर २ वर्षांनी सिद्धार्थ-कियारा आईबाबा झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आईबाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.