"लग्नाला नकार नाही पण...", सिद्धांत चतुर्वेदीला करायचंय अरेंज मॅरेज; म्हणाला, "आईला नातवंडं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:34 IST2026-02-24T15:33:31+5:302026-02-24T15:34:22+5:30
सिद्धांत चतुर्वेदीने पहिल्यांदाच लग्नावर मोकळेपणाने केलं भाष्य

"लग्नाला नकार नाही पण...", सिद्धांत चतुर्वेदीला करायचंय अरेंज मॅरेज; म्हणाला, "आईला नातवंडं..."
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा 'दो दीवाने सहर मे' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये तो मृणाल ठाकूरसोबत दिसत आहे. आजकालच्या तरुणांचं प्रेम, रिलेशनशिप यावर सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. सिद्धांत खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत होता. काही महिन्यातच त्यांचं ब्रेकअप झालं. आता सिद्धांतने सिनेमाच्या निमित्ताने लग्न, मुलं, संसार या गोष्टींवर भाष्य केलं आहे.
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला,"मला माझी आई लग्नाबद्दल सतत विचारत असते. आईला नातवांनाही बघायचं आहे. जेणेकरुन जेव्हा आम्ही कामावर जाऊ तेव्हा त्यांची काळजी घेणारं, त्यांच्यासोबत वेळ घालवणारं कोणीतरी असावं. पण मी तिला गंमतीत म्हणतो, 'आई, यासाठी लग्न करण्याची काय गरज आहे?'
तो पुढे म्हणाला, "लग्न हा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे आणि यात घाईगडबड करायला नको. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. लग्न हे दोन कुटुंबांचं असतं असंही मला वाटतं. त्यासाठी तसा जोडीदार मिळाला पाहिजे कारण आयुष्यभर आपल्याला त्याच्यासोबत राहायचं आहे. सामना खेळताना कोणी बॅटिंग सोडून मध्येच जायला नको. मला खेळायचं नाही असं म्हणू शकत नाही."
मला शतक गाठायचं आहे. माझं लग्न शंभर वर्ष टिकावं असं मला वाटतं. म्हणूनच विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. सगळं नीट बघून करायचं आहे. मी अरेंज मॅरेजसाठी ओपन आहे. माझ्या वयाचे लोक लग्न करत आहेत. कुटुंबात आपण एकमेकांचा नव्याने शोध घेतच असतो. त्यामुळे मला घाई करायची नाही. मला अरेंज मॅरेजची भीती वाटत नाही पण माझं अजून होत नाहीये त्यामुळे मी काय सांगू?" एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सिद्धांतने हिंट दिली होती की सिनेमाच्या शूटवेळीच त्याचा खरोखर प्रेमभंग झाला होता. या सिनेमानेच त्याला दु:खातून बाहेर काढलं.