सिद्धांत चतुर्वेदीच्या 'दो दीवाने सहर मे' सिनेमाची घोषणा, 'या' मराठी अभिनेत्रीची मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:13 IST2025-11-21T14:13:16+5:302025-11-21T14:13:50+5:30
सिद्धांतसोबत जमली 'या' मराठी अभिनेत्रीची जोडी, संजय लीला भन्साळींचा सिनेमा

सिद्धांत चतुर्वेदीच्या 'दो दीवाने सहर मे' सिनेमाची घोषणा, 'या' मराठी अभिनेत्रीची मुख्य भूमिका
संजय लीला भन्साळी प्रस्तुत आणि रवी उदयवार दिग्दर्शित आगामी सिनेमा 'दो दिवानी सहर मे'चा फर्स्ट लूक आला आहे. पुढील वर्षी व्हॅलेंटाईन वीकमध्ये सिनेमा भेटीला येणार आहे. सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत मराठी अभिनेत्री दिसणार आहे. टीझरच्या शेवटी दोघांचा किसींग सीनही बघायला मिळतो. कोण आहे ही अभिनेत्री आणि कधी रिलीज होणार सिनेमा?
सिद्धांत चतुर्वेदीने सोशल मीडियावर 'दो दीवाने सहर मे'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सुरुवातीला टीझर पूर्ण अॅनिमेटेड केला आहे ज्यातून ही लव्हस्टोरी असल्याचं कळत आहे. दोन्ही मुख्य पात्रांची यातून ओळख करुन दिली आहे. शेवटी सिद्धांत चतुर्वेदी आणि मराठी अभिनेत्री मृणाल ठाकुरची झलक दिसते. सिद्धांत शशांक आणि मृणाल रोशनीच्या भूमिकेत आहे. त्यांचा किसींग सीन दिसत आहे. दोघंही पहिल्यांदाच सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या लव्हस्टोरीमध्ये ही फ्रेश जोडी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 'दो दिल, एक शहर आणि एक अपरिपूर्ण परिपूर्ण प्रेम कहाणी' असं कॅप्शन टीझरला दिलं आहे.
सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकुर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 'इश्क से इश्क हो जाएगा' अशी ही लव्हस्टोरी पुढील वर्षी २० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 'सिड-मृणाल','मला टायटल आवडलं','सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.