सिड कियाराचं रिसेप्शन, पण शिल्पा शेट्टीवरच खिळल्या नजरा; हटके साडीत दिसली 'सुपरहॉट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 15:06 IST2023-02-13T15:05:58+5:302023-02-13T15:06:07+5:30
सिड कियाराच्या रिसेप्शन पार्टीत शिल्पा शेट्टीचा हॉट लुक, करिना कपूर खानही शिल्पासमोर फिकी पडली.

सिड कियाराचं रिसेप्शन, पण शिल्पा शेट्टीवरच खिळल्या नजरा; हटके साडीत दिसली 'सुपरहॉट'
बॉलिवूडमध्ये सध्या कपल्सचीच चर्चा आहे. त्यातच अनेक कपल्स लग्न करत असल्याने धमाल सुरु आहे. नुकतेच शेरशाह कपल सिड-कियारा (Sid-Kiara) लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सातफेरे घेतले. दरम्यान काल मुंबईत सिड कियाराच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनसाठी दाखल झालेल्या कलाकारांनी पार्टीत चार चॉंद लावले.
शिल्पा शेट्टी-करिना कपूरची गळाभेट
सिड-कियाराच्या रिसेप्शनसाठी दाखल होत असलेले सेलिब्रिटी बाहेरच फोटोग्राफर्सना पोज देत होते. यावेळी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पोहोचली आणि ती मीडियाला पोज देत होती. तेवढ्यात करिना कपूर खान रिसेप्शनमधून बाहेर पडत होती. यावेळी दोघीही समोरासमोर आल्या. शिल्पाला पाहताच करिना हसत हसतच तिच्याजवळ गेली आणि दोघींनी मिठी मारली. मात्र शिल्पाला फारसं काही न बोलू देताच करिना तिथून घाईघाईत निघाली.
यामुळे नेटकऱ्यांनी करिनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. करिना नेहमीच तिच्या अॅटिट्युडमध्ये असते असे युजर्स म्हणत आहेत. दरम्यान शिल्पा सिल्व्हर रंगाच्या ग्लिटरिंग हॉट साडीच रिसेप्शनसाठी दाखल झाली. बॅकलेस ब्लाऊजमध्ये आणि अगदी हटके साडी असा तिचा लुक होता. तर करिना कपूर गुलाबी रंगाच्या ग्लिटरिंग साडीत सुंदर दिसत होती. मात्र लुकमध्ये शिल्पाच भारी दिसत होती अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. करिना पेक्षा शिल्पानेच भाव खाल्ला आहे असं एका चाहत्यांने म्हणले आहे.