अमिताभ बच्चन यांचा नातू नव्हे 'इक्कीस' साठी 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती! 'या' कारणामुळे बदलली कास्टिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:07 IST2025-12-31T12:52:28+5:302025-12-31T13:07:01+5:30
वयामुळे भूमिका हातून निसटली! अमिताभ बच्चन यांचा नातू नव्हे इक्कीसमध्ये झळकला असता 'हा' स्टारकिड

अमिताभ बच्चन यांचा नातू नव्हे 'इक्कीस' साठी 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती! 'या' कारणामुळे बदलली कास्टिंग
Ikkis Movie Casting: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया हे नवे चेहरे इक्कीस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचीही चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.श्रीराम राघवन दिग्दर्शित हा सिनेमा १ जानेवारीला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ' या चित्रपटाची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. इक्कीस या चित्रपटातून अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटातील त्याची भूमिका आणि लूक हा अनेकांचं लक्ष वेधून घेतो आहे. पण तुम्हाला माहित आहे का? अगस्त्य नंदा, या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता. निर्मात्यांनी या भूमिकेसाठी दुसऱ्या एका स्टार किडचा विचार केला होता.
श्रीराम राघवन यांचा इक्कीस या सिनेमातून भारतीय सेनेच्या शौर्याची आणि अरुण खेत्रपाल यांच्या बलिदानाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.हा बहुचर्चित चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'बसान्तरच्या लढाई'वर आधारित आहे. मात्र, या चित्रपटासाठी पहिल्यांदा अगस्त्य ऐवजी अभिनेता वरुण धवनची निवड करण्यात आली होती. 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शकाने चित्रपटातून वरुण धवनला रिप्लेस करण्यामागचं कारण सांगितलं.
श्रीराम राघवन यांनी वरुण धवनसोबत बदलापूर या सिनेमासाठी काम केलं होतं.कोविड-१९ नंतर त्यांना सगळ्याच गोष्टीत बदल करावा लागला, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.
या कारणामुळे वरुण धवनला केलं रिप्लेस...
'द हिंदू'शी बोलताना दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी सांगितलं,"मी पटकथेवर काम करत असताना, माझ्या लक्षात आलं, या चित्रपटाच्या कथेनुसार कलाकाराचं वय हा देखील मुख्य मुद्दा आहे. काही दृश्यांमध्ये अरुण यांना १९ वर्षांचा दाखवण्यात आलं आहे.आपल्या चाळीशीत जितेंद्र झाडांभोवती नाचत होता, तो काळ आता राहिला नाही. त्या भूमिकेसाठी एका नवीन चेहऱ्याची गरज होती आणि जेव्हा अगस्त्याची निवड झाली, तेव्हा तो २१ वर्षांचा होता.मला वाटते की ते सर्व अगस्त्याच्या डोळ्यांमध्ये दिसून येते.त्यामुळे त्याची निवड करण्यात आली."असा खुलासा त्यांनी केला.