अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 15:35 IST2022-01-25T15:34:50+5:302022-01-25T15:35:31+5:30
श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने 'पुष्पा'च्या (Pushpa Movie) हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले आहे

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाआधी श्रेयस तळपदेने दिलाय या हॉलिवूडपटाला आवाज
सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित पुष्पा चित्रपटात (Pushpa Movie) अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.२०२१ला रिलीज झालेले अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा सूर्यवंशी(Sooryavanshi) आणि हॉलिवूडपट स्पायडर मॅनला (Spider Man) देखील पुष्पाने मागे टाकले आहे. हिंदी मार्केटमध्ये पुष्पाने अनेक बॉलिवूड चित्रपटांपेक्षा चांगली कामगिरी करून अनेक विक्रम मोडले आहेत.
श्रेयस तळपदेने पुष्पाच्या हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले आहे, हे चित्रपटप्रेमींना माहीत आहे. इक्बाल, डोर, ओम शांती ओम आणि गोलमाल रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आनंदी आहे.
पुष्पा चित्रपटाच्या आधी २०१९ मध्ये श्रेयसने हॉलिवूड चित्रपट 'द लायन किंग'साठी डबिंगही केले होते. डिस्नेच्या लाइव्ह-अॅक्शन चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये टिमॉनच्या पात्रासाठी अभिनेत्याने आपला आवाज दिला होता. त्यावेळी त्यांनी खुलासा केला होता की, आपण हे विशेषतः आपल्या मुलीसाठी केले आहे.
पुष्पा २वर काम करायला झाली सुरुवात
पुष्पा सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे निर्माते खूप खूष आहेत. त्यांनी अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम सुरू केले आहे. दुसरा भाग पुष्पा फ्रँचायझीचा समारोप असेल. दिग्दर्शक सुकुमार यांनी अलीकडेच खुलासा केला की, टीम या वर्षाच्या शेवटी म्हणजे १७ डिसेंबर रोजी पुष्पा २ रिलीज करण्याची योजना आखत आहे.