श्रद्धा कपूरने 'ईथा' सिनेमाचं पुण्यातलं शूट केलं पूर्ण, टीमसोबत कापला केक; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:49 IST2026-02-18T11:48:56+5:302026-02-18T11:49:46+5:30

तमाशा आणि लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकरांच्या भूमिकेत दिसणार श्रद्धा, 'हा' अभिनेताही मुख्य भूमिकेत

shraddha kapoor wraps pune schedule of eetha movie cuts cake with movie team laxman utekar and randeep hooda | श्रद्धा कपूरने 'ईथा' सिनेमाचं पुण्यातलं शूट केलं पूर्ण, टीमसोबत कापला केक; व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूरने 'ईथा' सिनेमाचं पुण्यातलं शूट केलं पूर्ण, टीमसोबत कापला केक; व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूरच्या आगामी 'ईथा' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. लक्ष्मण उतेकर सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर सिनेमा आधारित आहे. श्रद्धासोबत रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. नुकतंच सिनेमाच्या टीमने पुण्यातील शूटिंग शेड्युल पूर्ण केलं. पुणे शेड्युल रॅप करत श्रद्धाने टीमसोबत केक कट केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'ईथा' सिनेमाच्या सेटवर श्रद्धा कपूर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि रणदीप हुड्डा यांनी केक कापत पुणे शेड्युल पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन केलं. यावेळी सेटवरील इतर क्रूही उपस्थित होता. श्रद्धासोबत एक चिमुकला मुलगाही दिसत आहे ज्याला श्रद्धाने प्रेमाने केक भरवला. श्रद्धाने व्हाईट शर्ट आणि ग्रीन रंगाटी पँट परिधान केली आहे. त्यावर स्पोर्ट्स शूज घातले आहेत. अशा कॅज्युअल लूकमध्ये ती दिसत आहे. तर रणदीप हुड्डाही स्पोर्टी लूकमध्ये दिसतोय.


ईथा सिनेमासाठी श्रद्धा जोरदार तयारी करत आहे. तिने वजनही वाढवलं आहे. काही दिवसांपूर्वी शूटदरम्यान श्रद्धचाच्या पायाला दुखापत झाली होती. १५ दिवस तिला आरामाचा सल्ला दिला होता. ईथा सिनेमासाठी श्रद्धा खास नृत्यही शिकत आहे. 

विठाबाई नारायणगावकर यांचं लावणी आणि तमाशा या कलाप्रकारांप्रती असलेलं योगदान अतुलनीय आहे. याचीच दखल घेत त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणूनच त्या मराठी कलासृष्टीतील कालातीत व्यक्ती आहेत. दरम्यान श्रद्धा कपूर पंजाबी कुटुंबात जन्माला आलेली असली तरी तिच्यावर महाराष्ट्रीय संस्कारही झाले आहेत. तिची आई मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. श्रद्धा अनेकदा मराठमोळ्या लूकमध्येही दिसली आहे आणि तिने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे. आता विठाबाईंच्या भूमिकेत पाहण्यासाठी श्रद्धाचे चाहते आतुर आहेत.

Web Title : श्रद्धा कपूर ने पुणे में 'ईथा' की शूटिंग पूरी की, टीम के साथ मनाया जश्न।

Web Summary : श्रद्धा कपूर ने लावणी साम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर के जीवन पर आधारित फिल्म 'ईथा' की पुणे शूटिंग पूरी की। रणदीप हुड्डा के साथ टीम ने केक काटकर जश्न मनाया। श्रद्धा इस रोल के लिए खास डांस भी सीख रही हैं।

Web Title : Shraddha Kapoor completes 'Itha' shoot in Pune, celebrates with team.

Web Summary : Shraddha Kapoor wrapped Pune's 'Itha' schedule, a film based on Lavani queen Vithabai Narayangaonkar. Co-starring Randeep Hooda, the team celebrated with a cake cutting. Shraddha is also learning a special dance for the role.