विकी कतरिनानंतर बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नाच्याबेडीत ?,खुद्द तिच्या घरातल्यांनीच दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:56 IST2021-12-08T17:33:58+5:302021-12-08T17:56:34+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे.

विकी कतरिनानंतर बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नाच्याबेडीत ?,खुद्द तिच्या घरातल्यांनीच दिले संकेत
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding ) लग्नाच्या दरम्यान, श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) लग्नाची चर्चा देखील रंगली आहे.लवकरच श्रद्धाचे हात देखील पिवळे होणार आहेत. हिंदुस्तान टाईम्सा रिपोर्टनुसार, लवकरच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या घरी सुद्धा लग्नाची धामधुम सुरु होऊ शकते. श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांनी याबाबत हिंट दिली असून ही बातमी समोर येताच श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता लागली आहे.
रोहनसोबत घेणार श्रद्धा कपूर सात फेरे ?
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. आतापर्यंत श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाबाबत अनेक बातम्या येत होत्या, मात्र आता श्रद्धा कपूरची मावशी पद्मिनी कोल्हापुरे हिने आपल्या भाचीच्या लग्नाबाबत संकेत दिले आहेत.
अलीकडेच पद्मिनी कोल्हापुरे यानी स्वत:चे गाण 'ये गलियां ये चौवारा'चं रिक्रिएटेड वर्जन लॉन्च केलं होतं आणि स्वत:चं गायलं सुद्धा. श्रद्धा कपूरने हे गाणं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले, , 'मी तुझ्या लग्नात आणि वेदिकाच्या लग्नात हे गाणार आहे.'
सध्या श्रद्धा लव रंजनसोबत काम करत आहे. श्रद्धा तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी लंडनमध्ये शूट होणार्या चालबाज सिनेमाच्या रिमेकमध्येही दिसणार आहे. या भूमिकेसाठीबी ती तयारी करत आहे.