Stree 2 on OTT : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहाल? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 17:30 IST2024-10-10T17:29:05+5:302024-10-10T17:30:05+5:30
'स्त्री 2' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला होता.

Stree 2 on OTT : श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहाल? जाणून घ्या
जेव्हाही चित्रपटगृहांमध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा प्रेक्षक त्याच्या ओटीटी रिलीजची वाट पाहू लागतात. हॉरर-कॉमेडी चित्रपट असलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) 'स्त्री 2' च्या बाबतीतही तेच घडतंय. लोक या चित्रपटाची OTT वर येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर काही कारणास्तव तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नसेल, तर आता तुम्हाला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
'स्त्री 2' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर १५ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. चित्रपटानं रिलीज होताच थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. आता हा सिनेमा ओटीटीवर आला आहे. 'स्त्री 2' प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल. पण, सध्या हा सिनेमा रेंटवर आहे.
श्रद्धा कपूर , अभिनेता राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी अशी कलाकारांची मोठी फौज असलेल्या या सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. २०१८ साली आलेला 'स्त्री' चांगलाच गाजला होता. पण ६ वर्षांनंतर सिनेमाच्या आलेल्या सीक्वेलने कमालच केली आहे. 'स्त्री २' मध्ये मुख्य कलाकारांशिवाय अक्षय कुमार, तमन्ना भाटिया आणि वरुण धवन यांचा कॅमिओही आहे. 'स्त्री 2' एवढं यश याआधी कोणत्याही हिंदी सिनेमाला मिळवता आलेलं नाही.