धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 11:29 IST2022-02-01T11:28:57+5:302022-02-01T11:29:29+5:30

अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा नुकताच 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Shocking! 'Pushpa' fame Allu Arjun took a big decision, fans became angry | धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज

धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जातो. अल्लू अर्जुनची देशभरात खूप लोकप्रियता आहे. त्याचा नुकताच पुष्पा (Pushpa Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात अल्लूसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनने फक्त रुपेरी पडदाच नाही, तर समाजातही त्याचे मानाचे स्थान मिळवले आहे. याच कारणामुळे त्याने चित्रपटांच्या बाबतीतही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

अल्लू अर्जुनने फॅन्ससोबत असणाऱ्या नात्याबद्दल म्हटले की, हे खूप सुंदर नाते आहे. याकडे मी एक जबाबदारी म्हणून पाहतो. कारण, मी त्यांना उत्तरदायी आहे. प्रेक्षकांना काही झाले तर मला त्यांची काळजीही घ्यावी लागेल. हे एक प्रकारे देवाणघेवाणीचे नाते आहे. प्रेक्षकांनी आपल्याला इतके काही दिले आहे. त्याच्या बदल्यात आपण काही परतफेड करु शकलो तर हे भाग्यच आहे. 

या चित्रपटांमध्ये करणार नाही काम

व्यावसायिक सिनेमाच्याबाबतीत अल्लू अर्जुन खूप काळजी घेतो, यासंदर्भातील खुलासा नुकताच त्याने केला आहे. तो म्हणाला की, कमर्शिएल चित्रपट साकारताना मी खूप काळजी घेतो. जेणेकरून माझ्या मुलांना माझे काम पाहताना कोणताही संकोच वाटणार नाही. फक्त मुलेच नाही तर चित्रपट पाहायला आलेल्या महिलांनाही यामुळे संकोच वाटला नाही पाहिजे. मी अशा चित्रपटात कधीच काम करणार नाही, जे मी, माझी पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही. चित्रपट मी सहजपणे पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नसेल तर तो मी करणारच नाही.
दरम्यान, अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या भागाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. 

Web Title: Shocking! 'Pushpa' fame Allu Arjun took a big decision, fans became angry