Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:02 IST2021-11-18T16:01:59+5:302021-11-18T16:02:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Shocking! Katrina Kaif has run away from the wedding tent not once or twice but 6 times | Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ

Shocking! कतरिना कैफने एकदा-दोनदा नाही तर तब्बल ६ वेळा काढलाय लग्नमंडपातून पळ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नांच्या चर्चांना सध्या खूप उधाण आले आहे. इतकंच नाही तर जयपूरमध्ये एका अतिशय नयनरम्य ठिकाणी या जोडीच्या लग्नाची तयारीही सुरु असल्याचे समजते आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, लग्नमंडपापर्यंत पोहोचण्याची कतरिनाची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी तब्बल ६ वेळा तिने भर लग्नमंडपातून पळ काढला आहे. 

प्रत्यक्ष आयुष्यात लग्न करण्यास सज्ज झालेल्या कतरिना कैफसोबत हे सारं नेमकं केव्हा घडले असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? हे सर्व घडले तिने साकारलेल्या चित्रपटांमध्ये. 'नमस्ते लंडन' या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना लग्नमंडपातून पळून अखेर अक्षय कुमारशी पुन्हा लग्न करते असे दाखवण्यात आले आहे. 'सिंग इज किंग', 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटांमध्येही तिने लग्नमंडपातून पळ काढला आहे.  याशिवाय  'मैने प्यार क्यो किया?' आणि 'अजब प्रेम की गजब कहानी' या चित्रपटांमध्येही कतरिना कैफने लग्न मंडपातून पळ काढल्याचे पाहायला मिळाले आहे. कतरिना कैफचा हा अंदाज पाहता, आता विकी कौशलची ही 'रनवे ब्राईड' तिच्या खऱ्याखुऱ्या लग्नात काय वेगळे करते, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार कतरिना आणि विकी पुढील महिन्याच्या सुरुवातीला लग्नगाठ बांधणार आहेत. हॉटेल सिक्स सेंस बरवाडा फोर्टमध्ये कतरिना-विकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यासोबतच चौथ माता ट्रस्ट आणि हॉटेल शिवप्रिया पॅलेसमध्ये एकूण ४२ आलिशान खोल्यांचंही पाहुण्यांसाठीचे बुकिंग करण्यात आले आहे. आता सवाई माधोपूर रणथंबोर रोड स्थित फाइव्हा स्टार ताज आणि ऑबेरॉय हॉटेलमध्येही पाहुण्यांसाठीचे बुकिंग करण्यात आली आहे.

Web Title: Shocking! Katrina Kaif has run away from the wedding tent not once or twice but 6 times