"आमच्या छोट्या फ्लॅटमध्येही...", सैफवरील हल्ला प्रकरणी शिव ठाकरेने उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:45 IST2025-01-23T16:45:26+5:302025-01-23T16:45:44+5:30

शिव ठाकरेने थेट विचारला महत्वाचा प्रश्न

shiv thakare reacts to saif ali khan got attacked incidence asks what guards were doing | "आमच्या छोट्या फ्लॅटमध्येही...", सैफवरील हल्ला प्रकरणी शिव ठाकरेने उपस्थित केला प्रश्न

"आमच्या छोट्या फ्लॅटमध्येही...", सैफवरील हल्ला प्रकरणी शिव ठाकरेने उपस्थित केला प्रश्न

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan)  त्याच्याच घरात झालेल्या हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला. एवढा मोठा कलाकार, उच्चभ्रू इमारतीत घर, अनेक सुरक्षारक्षक असतानाही एक चोर थेट सैफच्या मुलांच्या बेडरुमपर्यंत गेला. इतकंच नाही तर त्याला पकडायला आलेल्या सैफवर त्याने चाकूने ६ वारही केले. हा सगळा प्रकार ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मराठमोळा शिव ठाकरेनेही नुकतीच या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिव ठाकरे पापाराझींशी बोलताना म्हणाला, "मला धक्काच बसला. आपल्याही घरात कोणी घुसत नाही यार. आमचा छोटासा फ्लॅट आहे त्यातही सिक्युरिटी गार्ड असतात. पण यांचे गार्ड काय झोपले होते का? सैफसाठी मला वाईटच वाटलं. पण यार इतके मोठे कलाकार आहेत त्यांचे गार्ड काय करत होते हा प्रश्न पडतो. असं काही नाही सेलिब्रिटींकडेच हे होतंय. सगळीकडेच आजकाल हे घडतंय. एवढंच की सेलिब्रिटींसोबत असं काही झालं की विषय मोठा बनतो. बाकी सामान्य लोकांचं सगळ्यांपर्यंत कसं पोहोचणार?" नमस्ते बॉलिवूडने हा व्हिडिओ शेअर केला आहे.


शिवच्या या व्हिडिओ सर्वांनीच सहमती दर्शवली. हे सगळीकडेच घडत आहे पण एखाद्या बॉलिवूड कलाकाराबद्दल किंवा सेलिब्रिटीसोबत झालं म्हणून याचा एवढा मोठा विषय बनला आहे. दरम्यान कालच सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्याला एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी अटकेत आहे.

Web Title: shiv thakare reacts to saif ali khan got attacked incidence asks what guards were doing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.