Video : शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन, पण 'त्या' कृतीमुळे राज कुंद्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 14:10 IST2023-09-18T14:10:26+5:302023-09-18T14:10:41+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन करण्यात आलं. पण, यावेळी शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वागणुकीमुळे त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

shilpa shetty welcome ganpati at home netizens troll actress husband raj kundra for wearing mask | Video : शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन, पण 'त्या' कृतीमुळे राज कुंद्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले...

Video : शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन, पण 'त्या' कृतीमुळे राज कुंद्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले...

देशात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन करतात. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन करण्यात आलं. पण, यावेळी शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वागणुकीमुळे त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. 

शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही शिल्पा शेट्टीने लाडक्या बाप्पाचं आगमन केलं. यावेळी शिल्पा तिचा पती राज कुंद्रासह दिसून आली. शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाच्या आगमनादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गणरायाला घरी आणण्यासाठी गेलेल्या राज कुंद्राने मास्क लावून चेहरा लपवल्याचं दिसत आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "राज कुंद्राचं घुंगट कधी बाजूला होणार? किती पाप करतोय...चेहरा पण दाखवता येत नाहीये", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "राज कुंद्राचा इथे पण ड्रामा" अशी कमेंट केली आहे. "चेहरा का लपवला आहे राज कुंद्राने?" असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे."बाप्पाला घ्यायला आला तरीही तोंड लपवलं आहे," अशी कमेंटही केली आहे. 

दरम्यान, शिल्पा शेट्टीने २००९साली उद्योगपती राज कुंद्रासह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना दोन मुले आहेत. 'सुखी' या चित्रपटातून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: shilpa shetty welcome ganpati at home netizens troll actress husband raj kundra for wearing mask