"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 08:42 IST2025-12-19T08:41:22+5:302025-12-19T08:42:15+5:30
शिल्पा शेट्टीच्या घरी काल आयकर विभागाने धाड मारल्याची माहिती समोर आली होती.

"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी काल १८ डिसेंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकल्याची बातमी आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा ६० कोटी रुपयांच्या हेरगिरीप्रकरणी अडचणीत आहेत. त्यांना अनेकदा चौकशीसाठीही समन बजावण्यात आलं होतं. ही कारवाई बंगळुरूमधील तिच्या प्रसिद्ध हॉटेल बॅस्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात करण्यात आली आहे.दरम्यान आता शिल्पा शेट्टीच्या वकिलांकडून यावर स्पष्टीकरण आलं आहे. छापा नाही तर केवळ रुटीन व्हेरिफिकेशन असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिल्पा शेट्टीचे वकील प्रशांत पाटील स्टेटमेंट जारी करत म्हणाले, "मी माझी क्लाएंट शिल्पा शेट्टीच्या वतीने हे स्पष्ट करु इच्छितो की तिच्याविरोधात आयकर विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. कुठेही छापा मारलेला नाही. आयकर विभागाचे अधिकारी केवळ रुटीन व्हेरिफिकेशनसाठी आले होते. ही एक फॉलो अप प्रक्रिया होती ज्याला चुकीचा संदर्भ जोडला जात आहे."
ते पुढे म्हणाले, "या घटनेचा संबंध ईओडब्ल्यूशी आहे असा दावा जे करत आहेत त्यांना न्यायालयात कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल. आम्ही हे स्पष्ट करत आहोत की शिल्पा शेट्टीच्या घरी छापेमारी झालेली नाही."
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील बिझनेसमॅन, कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांना त्यांच्या कंपनी ‘बेस्ट डील टीव्ही प्रा. लि.’ मध्ये ६० कोटी रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले, परंतु त्यांनी हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला.