'तो रात्री उशीरा...', गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी अक्षय कुमार करायचा ही गोष्ट, शिल्पा शेट्टीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:38 IST2023-03-20T19:36:35+5:302023-03-20T19:38:10+5:30
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

'तो रात्री उशीरा...', गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी अक्षय कुमार करायचा ही गोष्ट, शिल्पा शेट्टीचा खुलासा
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य केले आहे. शिल्पा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी एकेकाळी ती चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री होती. शिल्पा शेट्टीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शिल्पा शेट्टीचे अफेअर अक्षय कुमार(Akshay Kumar)सोबतही होते. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
शिल्पा शेट्टीचे अक्षय कुमारवर खूप प्रेम होते, पण जेव्हा तिला कळले की अक्षय तिची फसवणूक करत आहे तेव्हा ती कोलमडून गेली. २००० मध्ये शिल्पा शेट्टीने फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते. त्यावेळी शिल्पाने सांगितले होते की, अक्षय जेव्हा तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा दोन जणांना डेट करत होता. त्याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असण्यासोबतच तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता. जेव्हा तिला या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला.
शिल्पा म्हणाली होती की, माझ्यासाठी हा खूप वाईट काळ होता. पण मी त्यावर मात केली याचा मला आनंद आहे. काळोख्या रात्रीनंतर सकाळ येते. माझ्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही ठीक चालले होते, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. आता सर्वकाही मागे राहिले आहे. शिल्पाने असेही सांगितले की, अक्षय आपल्या प्रेयसीला मनवण्यासाठी एक युक्ती करायचा. अक्षय त्याच्या प्रेयसीला रात्री उशिरा मुंबईच्या सिद्धी विनायक मंदिरात घेऊन जायचा आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन द्यायचा. पण त्याच्या आयुष्यात एखादी नवीन मुलगी आली की तो दिलेले वचन विसरुन जायचा.
अक्षय कुमारचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. शिल्पापूर्वी त्याचे रवीना टंडनसोबतही रिलेशनशीपमध्ये होता. एवढेच नाही तर रेखासोबतही त्यांचे नाव जोडले गेले. अक्षय रवीनाशी लग्न करणार होता, पण जेव्हा रवीनाला कळले की अक्षय तिला फसवतो आहे तेव्हा अभिनेत्रीने स्वतःला त्याच्यापासून दूर केले.