शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48%, अभिनेत्रीने सांगितला शालेय जीवनातील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:24 IST2026-03-11T10:23:02+5:302026-03-11T10:24:22+5:30

Shilpa shetty: 'निकम्मा' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी शिल्पाने तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला होता.

shilpa-shetty-revealed-about-herself-said-in-childhood-mother-used-to-call-me-useless | शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48%, अभिनेत्रीने सांगितला शालेय जीवनातील किस्सा

शिल्पा शेट्टीला दहावीत मिळाले होते 48%, अभिनेत्रीने सांगितला शालेय जीवनातील किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) तिच्या अभिनयासोबतच फिटनेसमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांना फिटनेसचं महत्त्व समजावून सांगत असते. तर, काही वेळा तिचे पर्सनल अनुभवही शेअर करत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. यामध्ये तिने तिच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

'निकम्मा' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी शिल्पाने तिच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. शाळेत असतांना तिचे परिक्षेचे मार्क्स पाहून तिच्या आईने तिची चांगलीच 'शाळा' घेतली होती.

''मी दहावीत होते तेव्हाचा हा किस्सा आहे. माझ्या ssc एक्झामच्या पूर्वी प्रिलिअम एक्झाम झाली होती. या परिक्षेत मला फक्त 48%  मिळाले होते. मी त्यावेळी व्हॉलीबॉल प्लेअर होते. त्यामुळे मला अभ्यासापेक्षा इतर अॅक्टिव्हिटीज करण्यात जास्त रस होता. पण, ज्यावेळी माझ्या परिक्षेचे मार्क माझ्या आईने पाहिले त्यावेळी ती चांगलीच चिडली'', असं शिल्पा म्हणाली.

पुढे ती म्हणते, ''मला मिळालेले कमी मार्क्स पाहून आई प्रचंड संतापली आणि मला ओरडली. तू बेक्कार आणि बिनकामी (निकम्मी) आहेस असं तिने मला म्हटलं. भविष्यात मी व्हॉलीबॉल कोच व्हावं असं माझं त्यावेळी स्वप्न होतं. मात्र, माझ्या कमी मार्कांमुळे माझ्या आईला माझी चिंता होतीये हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी १० दिवस सगळं बाजूला ठेवून फक्त अभ्यास केला. आणि, फायनल एक्झाममध्ये चांगले गुण मिळवले.''

दरम्यान, शिल्पाने ९० च्या दशकात बाजीगर या सुपरहिट सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'धड़कन', 'रिश्ते, 'इंडियन', 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' और 'लाइफ इन ए मेट्रो' यांसारखे अनेक गाजलेले सिनेमा बॉलिवूडला दिले.

Web Title : शिल्पा शेट्टी को दसवीं में मिले 48%, अभिनेत्री ने बताया स्कूल का किस्सा।

Web Summary : शिल्पा शेट्टी ने बताया कि उन्हें दसवीं में 48% अंक मिले थे। उनकी माँ ने पढ़ाई की बजाय वॉलीबॉल पर ध्यान देने के लिए उन्हें डांटा। प्रेरित होकर, उन्होंने कड़ी मेहनत की और अंतिम परीक्षा में अपने परिणाम में सुधार किया। उन्होंने 'बाज़ीगर' से शुरुआत की और कई हिट फिल्मों में अभिनय किया।

Web Title : Shilpa Shetty's tenth grade score: Actress shares school life story.

Web Summary : Shilpa Shetty revealed she scored 48% in 10th grade. Her mother scolded her for focusing on volleyball over studies. Motivated, she then studied hard and improved her final exam results. She debuted in 'Baazigar' and starred in many hits.