कॉमेडीचा धमाल ‘हंगामा’! Hungama 2 चा ट्रेलर पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 15:43 IST2021-07-01T15:42:26+5:302021-07-01T15:43:25+5:30
Hungama 2 Trailer Out : तब्बल 18 वर्षांतर ‘हंगामा’ या सिनेमाचा सीक्वल येतोय आणि त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. धम्माल कॉमेडीने भरलेला हा ट्रेलर पोट धरून हसवतो.

कॉमेडीचा धमाल ‘हंगामा’! Hungama 2 चा ट्रेलर पाहिलात का?
2003 साली रिलीज झालेल्या ‘हंगामा’ या सिनेमाने खरोखर ‘हंगामा’ केला होता. या सुपरडुपर हिट कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता तब्बल 18 वर्षांतर या सिनेमाचा सीक्वल येतोय (Hungama 2 Trailer Out) आणि त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. तीन मिनिटांचा हा ट्रेलर धमाकेदार आहे.
परेश रावल (Paresh Rawal) पुन्हा एकदा राधेश्याम तिवारीच्या भूमिकेत आहेत आणि शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty ) त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. मिझान जाफरी (Meezan Jafri) , आशुतोष राणा, राजपाल यादव आणि प्रणिता सुभाष हेही जोडीला आहेत.
ट्रेलरच्या सुरूवातीलाच प्रणिता सुभाष आपल्याबरोबर एका लहान मुलीला घेऊन मिझानच्या घरी जाते. माझे व मिझानचे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांवर प्रेम आहे आणि हे मूल आम्हा दोघांचे आहे, असे ती आशुतोष राणाला सांगते. त्यानंतर वकील म्हणजे प्रवेश परेश रावल यांची एन्ट्री होते आणि इथून कॉमेडीचा धमाल ‘हंगामा’ सुरू होतो. परेश रावल यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते ती ग्लॅमरस शिल्पा शेट्टी. मुलाचा बाप कोण आहे, हे कन्फ्युजन आणि धम्माल कॉमेडीने भरलेला हा ट्रेलर पोट धरून हसवतो.
या चित्रपटाद्वारे शिल्पा शेट्टी तब्बल 13 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. 2007 साली आलेल्या आप या सिनेमात ती अखेरची झळकली होती.
हंगामा 2 हा चित्रपट ‘हंगामा’ फ्रेंचायझीचा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्ना, परेश रावल, आफताब शिवदासानी, रिमी सेन मुख्य भूमिकेत दिसले होते. आता काही जण वगळता नव्या चेहºयांसोबत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय खन्ना या चित्रपटात एक कॅमिओ करताना दिसणार आहे. ‘हंगामा 2’ 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियदर्शन यांनी ‘हंगामा 2’चे दिग्दर्शन केले आहे.