'धुरंधर'मधल्या FA9LA गाण्यावर शिल्पा शेट्टीने लावले ठुमके, म्हणाली- "अक्षय खन्ना तू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:13 IST2025-12-23T09:12:50+5:302025-12-23T09:13:12+5:30
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही 'धुरंधर'मधील या गाण्याची भुरळ पडली आहे. शिल्पा शेट्टीने या गाण्यावर ठुमके लावले आहेत.

'धुरंधर'मधल्या FA9LA गाण्यावर शिल्पा शेट्टीने लावले ठुमके, म्हणाली- "अक्षय खन्ना तू..."
'धुरंधर' सिनेमातील गाण्यांनी सगळ्यांनाच वेड लावलं आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील गाणी ट्रेंडिंग आहेत. अक्षय खन्नाचं FA9LA या गाण्याने तर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावरील रील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि काही सेलिब्रिटीही 'धुरंधर'मधील FA9LA या गाण्यावर रील व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही 'धुरंधर'मधील या गाण्याची भुरळ पडली आहे. शिल्पा शेट्टीने या गाण्यावर ठुमके लावले आहेत.
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी अक्षय खन्नाच्या एन्ट्री साँगवर डान्स करताना दिसत आहे. FA9LA गाण्याच्या हुकस्टेप्स शिल्पा करताना दिसत आहे. "फॅन तर मिळाला नाही पण मी फॅन झाले. मग हा ट्रेंड तर फॉलो करायलाच हवा", असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे. शिल्पा शेट्टीने 'धुरंधर'मधील कलाकारांचं कौतुकही केलं आहे. "रणवीर सिंग आपका टाइम आ गया...कुठलीही अतिशयोक्ती न करता, साजेशी अशी भूमिका तू साकारलीस. अक्षय खन्ना तुझा ऑरा... मॅडी तुझ्याव्यतिरिक्त ही भूमिका चांगली कोणी साकारू शकत नाही. अर्जुन रामपाल तुला याआधी कधीच असं पाहिलेलं नाही. संजय दत्त तू तर रॉकस्टार आहे", असं कॅप्शन तिने दिलं आहे.
पुढे ती म्हणते, "गौरव गेरा, मानव गोहिल आणि राकेश बेदी तुमचं कास्टिंग उत्तम आहे. आणि याचं श्रेय मुकेश छाबराला जातं. सिनेमाचं म्युझिक माझी प्लेलिस्ट झाली आहे. आदित्य धर तू असा देशभक्तीपर सिनेमा बनवला आहेस जो मी कित्येक दिवसांत पाहिला नव्हता".