सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली नवी कोरी रेंज रोव्हर, किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:32 IST2024-08-29T16:31:24+5:302024-08-29T16:32:12+5:30

बॉडीगार्ड शेराचं खरं नाव माहितीये का?

Shera Salman Khan s bodyguard bought a new Range Rover worth 1.4 crore | सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली नवी कोरी रेंज रोव्हर, किंमत वाचून व्हाल थक्क

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली नवी कोरी रेंज रोव्हर, किंमत वाचून व्हाल थक्क

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) बॉडीगार्ड शेरा (Shera) सुद्धा काही कमी सेलिब्रिटी नाही. सलमानसोबतच शेरालाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो सलमानचा बॉडीगार्ड म्हणून स्वत: हजर असतो. शिवाय त्याची स्वत:ची सुरक्षा एजन्सी आहे. शेराने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली. या कारची किंमत कोटीच्या घरात आहे. 

बॉडीगार्ड शेरा सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतो. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. नुकतंच त्याने नवीन कारसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली. यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. शेराने नवीन रेंज रोवर कार खरेदी केली आहे. काळ्या रंगाच्या या रेंज रोवरसोबत त्याने कडक फोटो शेअर केला आहे. 'देवाच्या आशीर्वादाने आमच्या घरात नवीन सदस्याचं स्वागत' असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

शेराने खरेदी केलेल्या या कारची बाजारातील किंमत तब्बल 1.4 कोटी रुपये आहे. फोटोत शेराचा दमदार स्वॅग पाहायला मिळत आहे. त्याच्या या फोटोला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. 'शेरा भाई, मला तुम्ही बॉडीगार्ड म्हणून ठेवा प्लीज, मी सुद्धा एक छोटी मोठी क्रेटा खरेदी करेन' अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे.


शेरा गेल्या 28 वर्षांपासून सलमानसोबत आहे. तो खान कुटुंबाचा एक सदस्यच असल्यासारखा आहे. सलमान जिथे जाईल तिथे त्याच्यामागे शेरा ढालसारखा उभा दिसतो. शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शेराला दर महिन्याला १५ लाख रुपये पगार मिळतो. 

Web Title: Shera Salman Khan s bodyguard bought a new Range Rover worth 1.4 crore