विराट कोहली पितो 'ते'च महागडं पाणी पिते शहनाझ गिल, किंमत ऐकून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:24 IST2025-10-30T10:23:13+5:302025-10-30T10:24:49+5:30
शहनाझने अलीकडेच एका मुलाखतीत या पाण्याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला.

विराट कोहली पितो 'ते'च महागडं पाणी पिते शहनाझ गिल, किंमत ऐकून थक्क व्हाल!
शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याकडील अनेक सेलिब्रिटीज व खेळाडू अल्कलाइन पाणी म्हणजेच काळे पाणी पिताना दिसतात. क्रिकेटपटू विराट कोहली, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, मलायका अरोरा, श्रुती हसन यांसारखे प्रसिद्ध व्यक्ती फिट राहण्यासाठी या काळ्या पाण्याचा वापर करतात. विशेषतः हे पाणी फ्रान्समधून आयात केलं जातं. आता अभिनेत्री शहनाझ गिलनंदेखील हे काळं पाणी पिण्यास सुरुवात केल्याचं समोर आलंय. शहनाझ गिलनं या पाण्याची किंमत आणि ते पिण्यामागचे कारण उघड केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शहनाझने अलीकडेच एका मुलाखतीत या पाण्याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला. शहनाझने सांगितले की ती हे पाणी फक्त शूटिंगदरम्यान पिते. ती म्हणाली, "मी हे पाणी फक्त शूटिंग दरम्यान पिते. त्यात खनिजे आहेत, असे मी ऐकले आहे. मी क्वचितच हे पाणी पिते".
शहनाझने खुलासा केला की, "हे पिण्याने काहीही होत नाही. ते फक्त सामान्य पाणी आहे. त्याची चव सामान्य पाण्यासारखी असते". शहनाझने गंमत म्हणून पुढे सांगितले की, "ते पाणी काळे दिसते, म्हणून मी ते 'कॉफी पीत आहे' असे समजून पिते". शहनाझने या पाण्याची किंमत १००, २०० आणि अगदी ६०० पर्यंत असते सांगितले.
पुढे शहनाझ म्हणाली, "माझ्या घरी एक अल्कलाइन वॉटर फिल्टर देखील आहे. मी लवकरच ते दुरुस्त करेन. मी असेही ऐकले आहे की या पाण्याने केस धुतल्यास केस उजळतात. मला त्याबद्दल जास्त माहिती नाही, म्हणून मी जे ऐकले आहे, तेच करत आहे. जर ते २-३ महिन्यांनी त्याचा फायदा दिसला, तर मी ते पुढेही करत राहीन". शहनाझ गिल सध्या तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'इक्क कुडी'मुळे चर्चेत आहे, जो ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.