Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:15 IST2025-06-30T10:14:23+5:302025-06-30T10:15:23+5:30

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीने पोलिसांना माहिती दिली.

shefali jariwala death update husband parag tyagi reveals exactly what happened that day | Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती

Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती

मॉडेल, अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं. शेफाली एवढी फीट असूनही तिला हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. आता पोलिसांनी केलेल्या तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण फॉरेन्सिक रिपोर्टमधून उलगडलं आहे. तसंच तिचा पती पराग त्यागीने त्या दिवशी नक्की काय काय घडलं हे सांगितलं.

अंबोली पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,"शेफालीचा बीपी कमी झाल्याने ती बेशुद्ध झाली होती असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. तसंच एंटि एजिंग गोळ्यांमुळेही तिच्या शरिरावर परिणाम झाला. याप्रकरणी कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत आणि कोणाचीही सदस्यांविरोधात कोणतीच तक्रार नाही. तसंच घातपाताचाही संशय नाही."

शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीने पोलिसांना माहिती दिली. तो म्हणाला की, "त्या दिवशी शेफालीने घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. तिचे आईवडीलही येणार होते. पूजेसाठी तिचा दिवसभर उपवास होता. नंतर तिने फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न तसंच खाल्लं आणि ती बेशुद्ध झाली."

'कांटा लगा'गर्ल शेफाली जरीवाला आता या जगात नाही यावर चाहत्यांचा विश्वासच बसत नाहीए. शेफालीच्या आईची आणि पती पराग त्यागी वाईट अवस्था झाली आहे. कालच परागने शेफालीच्या अस्थी जुहू येथे विसर्जित केल्या. मरेपर्यंत मला 'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखावं अशी इच्छा शेफालीने व्यक्त केली होती.

Web Title: shefali jariwala death update husband parag tyagi reveals exactly what happened that day