सोनाक्षीचा हात मागितल्यावर काय होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया?, जहीर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:37 IST2024-07-19T16:32:01+5:302024-07-19T16:37:14+5:30

जहीर इकबाल लग्नाची मागणी घालण्यासाठी सोनाक्षीच्या घरी गेला तेव्हा नेमकं काय घडलं माहितीये का?

Shatrughan Sinha s reaction when he proposed marriage with his daughter Sonakshi | सोनाक्षीचा हात मागितल्यावर काय होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया?, जहीर म्हणाला...

सोनाक्षीचा हात मागितल्यावर काय होती शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया?, जहीर म्हणाला...

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  ही अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha)  यांची लाडकी लेक आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा आहे. त्यामुळे त्यांची कोणालाही भीतीच वाटते. जेव्हा जहीर इकबाल (Zaheer Iqbal) लग्नाची मागणी घालण्यासाठी सोनाक्षीच्या घरी गेला तेव्हा नेमकं काय घडलं माहितीये का? नुकतंच जहीर आणि सोनाक्षीने याचा खुलासा केला.

सोनाक्षी आणि जहीर २३ जून रोजी लग्नबंधनात अडकले. मुंबईतील घरीच त्यांनी कोर्ट मॅरेज केले. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली. तसंच जहीरने शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झालेल्या भेटीचाही किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मी जेव्हा सोनाक्षीचा हात मागण्यासाठी गेलो तेव्हा आधीच खूप नर्व्हस होतो. मी कधीच सोनाक्षीच्या वडिलांशी असं समोरासमोर येऊन बोललो नव्हतो. जेव्हा ते आले तेव्हा आम्ही बाकी इतर विषयांवर गप्पा मारल्या. आमच्यात चांगला बाँड झाला. मग मी  त्यांना सोनाक्षीसोबत लग्न करायचं आहे असं सांगितलं. मला माहितीये त्यांच्याबद्दल लोकांना फार धाक वाटतो पण ते खूप प्रामाणिक, शांत आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत."

यावर सोनाक्षी म्हणाली, "मी जेव्हा वडिलांना जहीर आणि माझ्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा मी खूप घाबरले होते. ते काय म्हणतील याची मला कल्पना नव्हती. मी शांत राहायचा प्रयत्न करत होते. मी त्यांना विचारलं,'तुम्हाला माझ्या लग्नाची काळजी नाहीये का? मला त्याबद्दल काहीच विचारलं नाहीत? ' तेव्हा ते म्हणाले की मी तुझ्या आईला सांगितलं होतं की लेकीला विचार. मग मी त्यांना जहीरबद्दल सांगितलं. तेव्हा ते म्हणाले,'हो मी वाचलं. तुम्ही दोघंही समजूतदार आहात. मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी'. तेव्हा मला जाणवलं की माझे वडील खरंच किती शांत आहेत. त्यांचा आमच्या नात्यावर आक्षेप नव्हता."

Web Title: Shatrughan Sinha s reaction when he proposed marriage with his daughter Sonakshi