बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास शमीची पत्नी हसीन जहां सज्ज, बोल्ड फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 12:04 IST2018-07-12T12:00:46+5:302018-07-12T12:04:10+5:30
टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने आता मुंबईमध्ये मॉडलिंग सुरु केलं आहे. ती लवकरच दिग्दर्शक अमजद खानच्या 'फतवा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास शमीची पत्नी हसीन जहां सज्ज, बोल्ड फोटो व्हायरल
मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने आता मुंबईमध्ये मॉडलिंग सुरु केलं आहे. ती लवकरच दिग्दर्शक अमजद खानच्या 'फतवा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. डीएनएने दिलेल्या रिपोर्टनुसार, हसीन म्हणाली की, 'मला माझा आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी काम करण्याची गरज होती. त्यामुळेच मी अमजद खान यांना संपर्क केला आणि त्यांनी मला काम दिलं. मला कायदेशीर लढाई लढण्यासाठी पैशांचीही गरज आहेच'.
क्रिकेटर मोहम्मद शमी फसवणूक, हत्येचा प्रयत्न, बलात्कारसहीत अनेक आरोप हसीनने लावले होते. ४ महिन्यांआधी शमी विरोधात हसीनने तक्रार दाखल केली होती. हसीनने कोर्टात मागणी केली होती की, शमीने तिला दर महिन्याला १० लाख रुपये भत्ता द्यावा.
हसीनने याआधी प्रोफेशनल मॉडल म्हणून काम केलं आहे. त्यासोबत ती कोलकाता नाईट रायडर्सची चिअर लीडरही होती. २०१४ मध्ये शमीसोबत लग्न केल्यावर तिने मॉडलिंग बंद केलं. शमीला तिचं मॉडलिंग करणं पसंत नव्हतं. आता तिने पुन्हा या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हसीन सध्या जाधवपूरच्या आपल्या फ्लॅटमध्ये मुलांसोबत आणि बेबीसीटरसोबत रहाते.
हसीनने पुन्हा जिम जॉईन केलं असून १५ किलो वजन कमी केलंय. आता तिला कोलकत्याहून मुंबईला शिफ्ट व्हायचं आहे. एका रिपोर्टनुसार, हसीनने शमीकडे परत न जाण्याचा निर्णय घेतलाय. तिला आता कायदेशीर लढाई करायची आहे.