शाहरुख खानची लाडक्या लेकीसाठी खास पोस्ट; पण कोस्टारला दिला अभिनयाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 17:51 IST2023-08-30T17:46:41+5:302023-08-30T17:51:08+5:30

किंग खानने मुलगी सुहाना खानसाठी एक खास नोट शेअर केली आहे.

Shahrukh Khan's special post for his beloved girl Suhana Khan | शाहरुख खानची लाडक्या लेकीसाठी खास पोस्ट; पण कोस्टारला दिला अभिनयाचा सल्ला!

Suhana Khan

झोया अख्तर दिग्दर्शित आगामी 'द आर्चिज' सिनेमाच्या माध्यमातून किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. ती हटके लूक आणि बिनधास्त वावरामुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. किंग खानने मुलगी सुहाना खानसाठी एक खास नोट शेअर केली आहे. पण यात खास गोष्ट म्हणजे किंग खानने आपल्या मुलीला नाही तर को-स्टारला अभिनयाचा सल्ला दिला आहे. 

 शाहरुख खानने इंस्टाग्राम स्टोरीजवर मुलगी सुहाना खानचा बीटीएस फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मांजरीसोबत दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत शाहरुख खानने लिहले की,  माझ्या आवडत्या ठिकाणी तुला कॅमेऱ्यासमोर पाहून आनंद झाला. सुंदर दिसत आहेस. तुझा मला अभिमान आहे. पण तुझ्या-कोस्टार मांजरीला कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी काही प्रशिक्षणाची गरज आहे", असे मस्करीत म्हटले. त्यावर सुहानाने उत्तर देत म्हटलं की, माझही तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण, मला असे वाटते की मांजर परिपूर्ण आहे. यासोबत सुहानाने स्माईल इमोजी आणि हार्ट शेअर केले आहे.  


सुहानाचा 'द आर्चिज' हा सिनेमा प्रसिद्ध कॉमिक्सवर आधारित आहे. या सिनेमाची गेल्या काही महिन्यांपासून मोठी चर्चा होती. आता टिझर पाहिल्यानंतर याविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले तर तो 7 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या 'जवान'च्या चर्चेत आहे.

Web Title: Shahrukh Khan's special post for his beloved girl Suhana Khan