Shahrukh Khan Video : 'त्या' ट्रोलरच्या आक्षेपार्ह कमेंटवर शाहरुखने असा 'छक्का' मारला की...; पाहा SRK चा सेन्स ऑफ ह्युमर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:25 PM2022-12-26T16:25:14+5:302022-12-26T16:26:09+5:30

शाहरुख बॉलिवुडमध्ये रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जातो. मात्र शाहरुख आणखी एका कारणासाठीही प्रसिद्ध आहे ते म्हणजे त्याचा 'सेन्स ऑफ ह्युमर'.

shahrukh-khan-sense-of-humour-after-trollers-called-him-chhakka-went-viral-again-on-internet | Shahrukh Khan Video : 'त्या' ट्रोलरच्या आक्षेपार्ह कमेंटवर शाहरुखने असा 'छक्का' मारला की...; पाहा SRK चा सेन्स ऑफ ह्युमर

Shahrukh Khan Video : 'त्या' ट्रोलरच्या आक्षेपार्ह कमेंटवर शाहरुखने असा 'छक्का' मारला की...; पाहा SRK चा सेन्स ऑफ ह्युमर

googlenewsNext

Shahrukh Khan Video : शाहरुख खान सध्या आगामी पठाण सिनेमामुळे चर्चेत आहे. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख चाहत्यांच्या भेटीला येतोय. शाहरुख बॉलिवुडमध्ये रोमान्सचा बादशाह म्हणून ओळखला जातो. मात्र शाहरुख आणखी एका कारणासाठीही प्रसिद्ध आहे ते म्हणजे त्याचा 'सेन्स ऑफ ह्युमर'. शाहरुखकडे हजरजबाबीपणा आहे, तो थेट उत्तरं देण्यात तरबेज आहे हे अनेकदा दिसून आले आहे.

जेव्हा शाहरुखला म्हणले जाते 'छ्क्का एसआरके'

शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख आणि टीव्हीएफचे २ कलाकार आहेत. सोशल मीडियावर आपल्याबद्दल काय लिहिले जाते हे शाहरुख मोबाईलमध्ये वाचताना दिसत आहे. त्यात एकाची कमेंट खरं तर विचलित करणारी आहे. छक्का एसआरके अशी कमेंट एकाने केलेली आहे. ही कमेंट वाचून एखादा नक्कीच चिडेल पण शाहरुख खानचा सेन्स ऑफ ह्युमर बघा. ही कमेंट वाचून शाहरुख म्हणाला, 'मी इतका मोठा आहे की चौका तर असूच शकत नव्हतो. रन्स वगरे नाही तर मी थेट छ्क्काच मारतो.' शाहरुख खानच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

शाहरुख खानचा पठाण सिनेमा २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. पठाणवरुन सध्या वातावरण तापलेले आहे. पठाण हे टायटल असो किंवा त्यातील बेशरम रंग हे गाणे असो, सिनेमा वादात अडकला आहे. आता याचा पठाण ला फायदा होतोय की तोटा हे लवकरच कळेल.

Web Title: shahrukh-khan-sense-of-humour-after-trollers-called-him-chhakka-went-viral-again-on-internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.