Shahrukh Khan : 'सिनेमा हिट झाला तर माज आला', चाहत्याचा हात झटकल्याने किंग खानवर नेटकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 11:45 IST2023-05-03T11:43:45+5:302023-05-03T11:45:09+5:30
चाहता सेल्फी घ्यायला येताच शाहरुखने त्याचा हात झटकला.

Shahrukh Khan : 'सिनेमा हिट झाला तर माज आला', चाहत्याचा हात झटकल्याने किंग खानवर नेटकरी संतापले
सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी कसं वागतात याकडे नेटकऱ्यांचं बारीक लक्ष असतं. कोणी काही चूक केली की लगेच ट्रोलिंग सुरु होतं. नुकतंच बॉलिवूडचा 'पठाण' शाहरुख खान (Shahrukh Khan) 'जवान' सिनेमाचं काश्मीरमधील शूट संपवून मुंबईत दाखल झाला. यावेळी मुंबई विमानतळाववर त्याच्याभोवती प्रचंड सुरक्षा होती मात्र तरी एक चाहता शाहरुखजवळ सेल्फी घेण्यासाठी पोहोचला. यानंतर शाहरुखने जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी त्याला सुनावलं आहे.
मॅनेजर पूजा ददलानीसोबत शाहरुख खानविमानतळावर दाखल झाला होता. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. या गर्दीतून वाट काढत दोघंही आपल्या गाडीकडे जात होते. तेवढ्यात एक चाहता मध्ये आला आणि त्याने सेल्फी घेण्यासाठी मोबाईल पुढे केला. हे पाहताच शाहरुखने जोरात त्याचा हात झटकला. नंतर त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याला बाजूला केलं. शाहरुखचं हे कृत्य नेटकऱ्यांना मात्र रुचलं नाही. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत शाहरुखला खडेबोल सुनावले आहेत.'अजून हिट करा या लोकांचा सिनेमा','लोकं का यांना डोक्यावर घेतात, काय करायचाय त्यांच्यासोबत सेल्फी','उगाचच अॅटिट्यूड' अशा कमेंट्स नेटकऱ्यांना केल्या आहेत. शाहरुख सध्या आगामी 'जवान' आणि 'डंकी' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकताच तो 'जवान'चे काश्मीर शेड्यूल संपवून परतला आहे.