आर्यनसाठी Shahrukh Khan करणार ही खास व्यवस्था, मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्लॅन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 01:40 PM2021-11-01T13:40:40+5:302021-11-01T13:41:19+5:30

Aryan Khan : मीडिया रिपोर्टनुसार शाहरूख खान आणि गौरी खानने आर्यनसाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानसोबत त्याचे बॉडीगार्ड त्याच्या सावलीप्रमाणे सोबत असतात.

Shahrukh Khan to hire private bodyguard for son Aryan Khan ensuring his safety | आर्यनसाठी Shahrukh Khan करणार ही खास व्यवस्था, मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्लॅन सुरू

आर्यनसाठी Shahrukh Khan करणार ही खास व्यवस्था, मन्नतपासून दूर ठेवण्याचा प्लॅन सुरू

googlenewsNext

शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) आपला मोठा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) आरोग्य आणि सुरक्षेबाबत आधीपेक्षा जास्त स्ट्रिक्ट झाले आहेत. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये (Aryan Khan Drugs Case) अडकल्यानंतर आणि तुरूंगात गेल्यावर शाहरूख आणि गौरी चिंतेत होते. आता मुलगा घरी परत आल्यावर दोघांनी मोठे निर्णय घेतले आहेत. ज्याद्वारे ते मुलाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतील.

आर्यनसाठी बॉडीगार्ड

मीडिया रिपोर्टनुसार शाहरूख खान आणि गौरी खानने आर्यनसाठी पर्सनल बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरूख खानसोबत त्याचे बॉडीगार्ड त्याच्या सावलीप्रमाणे सोबत असतात. आता आर्यनकडेही बॉडीगार्ड असेल. Bollywoodlife याबाबत सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, 'शाहरूखला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तो आतून हादरला आहे. तो हा विचार करतोय की, जर आर्यनकडे स्वत:चा बॉडीगार्ड असता तर कदाचित हे प्रकरण इतकं वाढलं नसतं. त्यामुळे तो आता लवकरच आर्यनसाठी बॉडीगार्ड ठेवणार आहे'.

मन्नतपासून दूर होईल आर्यन

त्यासोबत चर्चा अशीही सुरू आहे की, शाहरूख खान आर्यन खानला दिवाळीनंतर मन्नतपासून दूर करण्याचा विचार करत आहे. ड्रग्स केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करावा लागला. अटीनुसार आर्यन विना परवानगी मुंबई किंवा भारतातून बाहेर जाऊ शकत नाही. अशात शाहरूख खान आर्यनला अलिबागमधील फार्म हाऊसवर शिफ्ट करेल.

आर्यन खानसाठी ऑक्टोबर महिना फारच अडचणीचा राहिला. शाहरूख आणि गौरी विचार करत आहेत की त्यांना मीडियापासून ब्रेक मिळावा आणि त्यांनी स्वत:वर लक्ष द्यावं. त्यामुळे आर्यन खानला दिवाळीनंतर अलिबागला पाठवलं जाईल. शाहरूखची इच्छा आहे की, आपला ट्रॉमा दूर करण्यासाठी आर्यनने अलिबागमध्ये रहावं. 

डिसेंबरमध्ये पुन्हा काम सुरू करणार शाहरूख

मुलगाच अडकल्याने शाहरूख खानचं काम थांबलं होतं. तो पठाण आणि Atlee चा सिनेमा मधेच सोडून आला होता. याबाबत अशी चर्चा आहे की, शाहरूख खान डिसेंबरमध्ये पुन्हा काम सुरू करेल. सध्या शाहरूख परिवारासोबत दिवाळी साजरी करणार आहे. यानंतर पूर्ण परिवार काही दिवसांसाठी आर्यनसोबत अलिबागला राहणार. शाहरूखने काम सुरू केल्यावर गौरी, छोटा मुलगा अबराम आणि आर्यनसोबत अलिबागमधेच राहील.  
 

Web Title: Shahrukh Khan to hire private bodyguard for son Aryan Khan ensuring his safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.