Pathaan Movie : किंग खानसाठी चाहत्यांचे 'खास गिफ्ट', तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत पठाण बघण्याच्या तयारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 12:13 IST2023-01-14T12:12:50+5:302023-01-14T12:13:44+5:30

४ वर्षांनंतर शाहरुख रुपेरी पडद्यावर चाहत्यांना भेटणार आहे तेही अॅक्शन अवतारात. पठाणचे ट्रेलर तर चाहत्यांना डोक्यावर घेतले आहे.

shahrukh khan fans gift to king khan 50 thousand fans will come together to watch pathaan first day first show | Pathaan Movie : किंग खानसाठी चाहत्यांचे 'खास गिफ्ट', तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत पठाण बघण्याच्या तयारित

Pathaan Movie : किंग खानसाठी चाहत्यांचे 'खास गिफ्ट', तब्बल ५० हजार चाहते एकत्र येत पठाण बघण्याच्या तयारित

Pathaan Movie : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'पठाण'ची उत्सुकता चाहत्यांना आहे. ४ वर्षांनंतर शाहरुख रुपेरी पडद्यावर चाहत्यांना भेटणार आहे तेही अॅक्शन अवतारात. पठाणचे ट्रेलर तर चाहत्यांना डोक्यावर घेतले आहे. ट्रेलर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता शाहरुखच्या चाहते त्याला खास गिफ्ट देणार आहेत ते नेमके काय बघुया 

५० हजार चाहते एकत्र येणार

२५ जानेवारी रोजी पठाण सिनेमा प्रदर्शित होत आहे. यानिमित्त शाहरुखचे चाहते त्याला खास गिफ्ट देण्याच्या तयारित आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, किंग खानचे ५० हजार चाहते एकत्र येत पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहेत. 

शाहरुख खानचा srk युनिव्हर्स फॅन क्लबने भारतातील २०० पेक्षा अधिक शहरांमध्ये पठाण च्या फर्स्ट डे फर्स्ट शो चे आयोजन केले आहे. या क्लबचे संस्थापक यश परयानी म्हणाले, 'SRK युनिव्हर्स २०० हून अधिक शहरात पठाणचे शो आयोजित करत आहे. यामध्ये ५० हजारांहून जास्त चाहते सहभागी होतील अशी आशा आहे. यामधून आम्ही १ कोटी रुपयांची बुकिंग करु शकतो. शाहरुखच्या कमबॅकचा जल्लोष फक्त पहिल्या दिवसापुरते मर्यादित न ठेवता प्रजासत्ताक दिनी सुद्धा अधिकाधिक बुकिंग करण्याचा आमचा प्रयत्न असेल.'

ते पुढे म्हणाले, 'पठाण IMAX फॉर्मेटमध्ये शूट झालेला पहिला भारतीय सिनेमा आहे. सर्व शहरात जास्त करुन IMAX शो साठी बुकिंग होईल. पठाण आम्ही एखाद्या सणासारखा सेलिब्रेट करणार आहोत. 

२५ जानेवारी रोजी पठाण प्रदर्शित होत असून चाहतेही तयारीला लागल्याचं यातून दिसतंय. जितकी टीका या सिनेमावर करण्यात आली तितकाच सिनेमाला फायदा झाला आहे. दुबईच्या बुर्ज खलिफावर देखील पठाणचे ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भुमिका आहेत.

Web Title: shahrukh khan fans gift to king khan 50 thousand fans will come together to watch pathaan first day first show