'तुझा चेहरा खास नाही, तरी स्टार कसा झालास?' चाहत्याने विचारला खोचक प्रश्न, शाहरुख म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:52 IST2025-10-31T11:48:59+5:302025-10-31T11:52:34+5:30
शाहरुखला एका चाहत्याने त्याच्या दिसण्याबद्दल खोचक प्रश्न विचारला. यावर शाहरुखने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे

'तुझा चेहरा खास नाही, तरी स्टार कसा झालास?' चाहत्याने विचारला खोचक प्रश्न, शाहरुख म्हणाला-
शाहरुख खान (shahrukh khan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. शाहरुखला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय. शाहरुख लवकरच आपला ६० वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्त शाहरुखने सोशल मीडियावर #askSRK सेशन केलं. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. अशातच एका स्पर्धकाने शाहरुखला खोचक प्रश्न विचारला. त्यावर किंग खानने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
चाहत्याकडून शाहरुखला प्रश्न
#askSRK सेशनदरम्यान किंग खानला एका चाहत्याने एक विचित्र आणि खोचक प्रश्न विचारला. तो म्हणाला की, ''भाई मला एक गोष्ट सांग. तुझा चेहरा इतका खास नाही तरी तू स्टार कसा झालास? तुझ्यापेक्षा जास्त सुंदर तर माझा चेहरा आहे पण मला कोणी ओळखत नाही!'' यावर शाहरुखने एका वाक्यात या चाहत्याला उत्तर देऊन त्याचा हजरजबाबीपणा दाखवला. शाहरुख म्हणाला, ''भाई चेहऱ्याबद्दल बोललास तू ठीक आहे  पण बुद्धीबद्दल नाही म्हणालास. ती आहे की...?''
भाई शकल तो ठीक है …अक़्ल का नहीं बोला तुमने!!! वो है या….??? https://t.co/xoR50vsxZZ
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 30, 2025
शाहरुख खान यंदा अलीबागला त्याच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे वाढदिवशी मन्नतबाहेर येऊन शाहरुख त्याच्या चाहत्यांना भेटणार की नाही, याबद्दल शंका आहे. शाहरुख सध्या आगामी 'किंग' सिनेमाचं शूटिंग करतोय. या सिनेमात त्याच्यासोबत सुहाना खान, अर्शद वारसी, जयदीप अहलावत हे कलाकार दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. शाहरुखचा या सिनेमासाठी एकदम वेगळा आणि हटके लूक असणार आहे. सर्वांना 'किंग'ची उत्सुकता आहे.
