Dunki-Pushpa 2: अल्लू अर्जुन शाहरुख खानशी भिडणार; 'डंकी' आणि 'पुष्पा-2' एकाच दिवशी रिलीज होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 15:11 IST2022-11-11T15:10:41+5:302022-11-11T15:11:42+5:30

शाहरुख खानचा 'डंकी' ख्रिसमसला रिजील होत आहे, तर 'पुष्पा 2' याच दिवसी रिलीज होण्याची शक्यता आहे.

Shahrukh Khan Dunki and Allu Arjun pushpa-2 to be clashed at box office on christmas 2023 | Dunki-Pushpa 2: अल्लू अर्जुन शाहरुख खानशी भिडणार; 'डंकी' आणि 'पुष्पा-2' एकाच दिवशी रिलीज होणार

Dunki-Pushpa 2: अल्लू अर्जुन शाहरुख खानशी भिडणार; 'डंकी' आणि 'पुष्पा-2' एकाच दिवशी रिलीज होणार

DunkivsPushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानंतर आता प्रेक्षक चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत तेलगू सोबतच हिंदी प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. 'पुष्पा द रुल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण युनिट परदेशात पोहोचले आहे. अल्लू अर्जुनही रविवारपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दरम्यान, या चित्रपटामुळे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झोप उडू शकते.

अल्लूची शाहरुख टक्कर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा द रुल' 2023च्या ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो. तर, शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपटही याच मुपूर्तावर चित्रपटगृहांमध्ये येणार आहे. आजकाल बॉलिवूड चित्रपटांची काय अवस्था झाली आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. साऊथचे सिनेमे ज्या प्रकारे एकापाठोपाठ एक बंपर हिट्स देत आहेत, त्यामुळे बॉलिवूडची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानच्या 'डंकी'ची 'पुष्पा 2' सोबतची बॉक्स ऑफिस स्पर्धा चिंतेची बाब आहे.

चित्रपटाचे काम सुरू
'KGF 2' च्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर, 'पुष्पा 2' चे निर्माते या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेत आहेत. दुसऱ्या पार्टसाठी 'पुष्पा 2'चे शूटिंग भारतातील जंगलात नाही, तर परदेशात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा द रुल' चित्रपटाचे पहिले 15 दिवसांचे शेड्यूल थायलंडची राजधानी बँकॉकजवळ होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी संपूर्ण युनिट तिथे पोहोचले आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनसाठी टीमने रात्रंदिवस मेहनत करून आपले काम जवळपास पूर्ण केले आहे. 

'पुष्पा द राइज'ने एकट्या हिंदीत 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यावेळी 'पुष्पा द रुल' या चित्रपटाच्या शूटिंगबाबत अल्लू अर्जुन स्वतः सर्व कामे पाहत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर 'पुष्पा 2' रिलीज होतो का, हे पाहावे लागेल. पण, यामुळे शाहरुखसमोरील आव्हाने नक्की वाढणार आहेत. शाहरुखचा डंकी राजकुमार हिराणी डायरेक्ट करत आहे.

Web Title: Shahrukh Khan Dunki and Allu Arjun pushpa-2 to be clashed at box office on christmas 2023