शाहरुख खानने खरेदी केली मर्सिडीज बेंझ व्ही-क्लास, किंमत आहे कोटींच्या घरात, चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:43 IST2026-04-01T11:40:17+5:302026-04-01T11:43:41+5:30

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान त्याच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या गाड्यांच्या आवडीसाठी ओळखला जातो. आता त्याच्या ताफ्यात आणखी एका आलिशान गाडीची भर पडली आहे

Shahrukh Khan bought new Mercedes-Benz V-Class car price details inside | शाहरुख खानने खरेदी केली मर्सिडीज बेंझ व्ही-क्लास, किंमत आहे कोटींच्या घरात, चाहते थक्क

शाहरुख खानने खरेदी केली मर्सिडीज बेंझ व्ही-क्लास, किंमत आहे कोटींच्या घरात, चाहते थक्क

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान त्याच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या गाड्यांच्या आवडीसाठी ओळखला जातो. आता त्याच्या ताफ्यात आणखी एका आलिशान गाडीची भर पडली आहे. शाहरुखने नुकतीच मर्सिडीज बेंझ व्ही-क्लास (Mercedes-Benz V-Class) ही व्हॅन खरेदी केली असून, या गाडीची किंमत सुमारे १.४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानेही अशीच गाडी खरेदी केली होती.

शाहरुखला आलिशान आणि लक्झरी गाड्यांची आवड आहे. शाहरुखच्या ताफ्यात अशा अनेक गाड्या आहेत. शाहरुखने घेतलेली मर्सिडीज बेंझची ही 'व्ही-क्लास' केवळ एक गाडी नसून चालते-फिरते आलिशान घर आहे. लांबच्या प्रवासासाठी आणि कामाच्या दरम्यान विश्रांतीसाठी ही गाडी अत्यंत सोयीची मानली जाते. शाहरुखने त्याच्या कामाच्या गरजा लक्षात घेऊन ही 'मल्टी पर्पज' गाडी निवडली आहे.


बी-टाऊनमध्ये सध्या या गाडीची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या आणि शाहरुख खान व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्याकडेही ही आलिशान व्हॅन आहे. सोशल मीडियावर चर्चा शाहरुखने ही गाडी खरेदी केल्याचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, सेटवर येण्या-जाण्यासाठी तो या नवीन गाडीचा वापर करताना दिसण्याची शक्यता आहे.

Web Title : शाहरुख खान ने खरीदी मर्सिडीज-बेंज वी-क्लास, कीमत करोड़ों में, प्रशंसक दंग

Web Summary : शाहरुख खान, जो अपनी शानदार जीवनशैली के लिए जाने जाते हैं, ने अपनी कार संग्रह में लगभग 1.4 करोड़ रुपये की मर्सिडीज-बेंज वी-क्लास को शामिल किया। यह बहुउद्देशीय वाहन एक चलते-फिरते शानदार घर की तरह है, जो लंबी यात्राओं और काम के दौरान आराम के लिए आदर्श है। कई बॉलीवुड सितारों के पास यह वैन है।

Web Title : Shah Rukh Khan buys Mercedes-Benz V-Class worth crores, fans stunned.

Web Summary : Shah Rukh Khan, known for his luxurious lifestyle, added a Mercedes-Benz V-Class, costing around ₹1.4 crore, to his car collection. This multi-purpose vehicle is like a moving luxurious home, ideal for long journeys and rest during work. Several Bollywood stars own this van.