"मार डालो मुझे!"; शाहरुखसोबत असं काय घडलं की, माधुरी दीक्षित चांगलीच घाबरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:19 IST2026-02-25T16:13:10+5:302026-02-25T16:19:53+5:30
संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' हा चित्रपट बॉलिवूडमधील एक अजरामर कलाकृती मानली जाते. या चित्रपटातील 'मार डाला' या गाण्याने तर इतिहास घडवला. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान यांच्यादरम्यान एक अशी गोष्ट घडली की, त्यामुळे शाहरुख माधुरीवर चांगलाच चिडला. काय घडलं होतं नेमकं?

"मार डालो मुझे!"; शाहरुखसोबत असं काय घडलं की, माधुरी दीक्षित चांगलीच घाबरली
संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' हा चित्रपट बॉलिवूडमधील एक अजरामर कलाकृती मानली जाते. या चित्रपटातील 'मार डाला' या गाण्याने तर इतिहास घडवला. मात्र, या गाण्याच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान यांच्यादरम्यान एक अशी गोष्ट घडली की, त्यामुळे शाहरुख माधुरीवर चांगलाच चिडला होता. काय घडलं होतं नेमकं?
भारी दुपट्ट्याचा शाहरुखला बसला फटका
माधुरी दीक्षितने द ग्रेट इंडियन कपिल शर्मा या शोमध्ये सांगितले की, 'चंद्रमुखी'च्या भूमिकेसाठी तिला अत्यंत जड कपडे आणि दागिने परिधान करावे लागले होते. एका सीनमध्ये माधुरीला तिच्या भरजरी पदराचे टोक अदाकारीने शाहरुखच्या चेहऱ्यावर मारायचे होते. मात्र, त्या पदराच्या टोकाला जड आणि गोल मोती लावले होते.''
माधुरी म्हणाली, "जेव्हा मी पहिल्यांदा माझा पदर मारला, तेव्हा त्यातील मोती शाहरुखला खूप जोरात लागले. मी घाबरले, पण शाहरुखने मस्करीत म्हटले की, 'जोरात मार... मारुनच टाक मला! एकाच टेक मध्ये हा सीन पूर्ण कर, नाहीतर मला वारंवार मार खावा लागेल.'" शाहरुखच्या कपाळाला ते जड मोती वारंवार लागत होते आणि ते खूप वेदनादायक होते, असेही माधुरीने नमूद केले.
१० किलोचा ड्रेस
माधुरीने परिधान केलेला तो प्रसिद्ध हिरवा अनारकली सूट प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी-संदीप खोसला यांनी तयार केला होता. दोन महिने रात्रंदिवस काम करून तयार केलेल्या या ड्रेसचे वजन तब्बल १० किलोग्रॅम होते. जॅकी श्रॉफ यांनी याबद्दलची एक आठवण शेअर केली. ते म्हणाले, "गाण्यात माधुरीला गोल फिरायचे होते. ड्रेस इतका जड होता की माधुरी आधी थांबायची, पण तिचा ड्रेस काही वेळ फिरतच राहायचा. यामुळे तिचा तोल जाण्याची भीती होती, पण तिने ते अत्यंत सफाईदारपणे सांभाळले."
परफेक्ट शॉटसाठी घेतली मेहनत
एकूणच वारंवार टेक झाल्याने, ते मोती शाहरुखला लागले तरीही माधुरीने आपल्या नृत्याने आणि शाहरुखने आपल्या शांतपणे हा छोट्याश्या सीनमध्ये चांगला अभिनय केला. जुन्या आठवणींना उजाळा देताना कलाकारांनी सांगितले की, पडद्यावर दिसणारे सौंदर्य निर्माण करण्यासाठी पडद्यामागे किती शारीरिक त्रास सहन करावा लागतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.