पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ, मिळाली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 12:13 IST2023-12-10T12:12:58+5:302023-12-10T12:13:44+5:30

मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला.

Shahrukh khan Ajay Devgn, Akshay Kumar in trouble regarding Pan Masala advertisement got notice | पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ, मिळाली नोटीस

पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय, अक्षयकुमारच्या अडचणीत वाढ, मिळाली नोटीस

बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान (Shahrukh Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगण (Ajay Devgn)तिघांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली आहे. तिघांची पान मसाल्याची जाहिरात पुन्हा चर्चेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने केलेल्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार, पान मसाला जाहिरातप्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमारला नोटीस मिळाली आहे. 

या प्रकरणात केंद्र सरकारच्या सुचनेनुसार उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 9 मे 2024 पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान खंडपीठाने याप्रकरणी आदेश दिले आहेत. मध्यंतरी अक्षय कुमार दोन जाहिरातींमध्ये दिसला होता. मात्र नंतर त्याने करार रद्द केला. तरी त्यालाही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

शाहरुख, अजय आणि अक्षय तिघांचं बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. तिघेही पद्म पुरस्काराने सम्मानित आहेत. या सम्मानित लोकांनी केलेल्या अशा जाहिरातींमुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होत आहे असं याचिकाकर्ते मोतीलाल यादव यांचे म्हणणे आहे. कलाकारांच्या या वागण्यामुळे लोक चुकीच्या मार्गाला जातात असंही ते म्हणाले.

Web Title: Shahrukh khan Ajay Devgn, Akshay Kumar in trouble regarding Pan Masala advertisement got notice