विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो'ची चर्चा; पण शाहिद कपूर म्हणतो, "मी स्टार नाही तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:28 IST2026-01-15T12:28:23+5:302026-01-15T12:28:57+5:30
'ओ रोमिओ' खऱ्या आयुष्यात कसा आहे? म्हणाला...

विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो'ची चर्चा; पण शाहिद कपूर म्हणतो, "मी स्टार नाही तर..."
शाहिद कपूर आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज ही जोडी खतरनाक आहे. 'हैदर', 'कमिने' असे दमदार सिनेमे या जोडीने दिले आहेत. आता त्यांच्या 'ओ रोमियो' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिनेमात शाहिदचा लूक, स्टाईल, डायलॉग्स सगळंच खूप चर्चेत आहे. शिवाय यामध्ये कलाकारांची फौजच आहे. नाना पाटेकर, फरिदा जलाल, विक्रांत मेस्सी, तमन्ना, अविनाश तिवारी, दिशा पाटनी आणि तृप्ती डिमरी यांचीही भूमिका आहे. नुकतंच शाहिदने स्टारडमवर भाष्य केलं. तो स्वत:ला स्टार समजत नाही असं तो म्हणाला.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शाहिद कपूर म्हणाला, "तुमची खरी ओळख ही तुम्ही स्वत:ला किती ओळखता यातच आहे इतरांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यात नाही ही मोठी शिकवण मला मिळाली आहे. प्रसिद्धी नक्कीच भारावून टाकणारी असते आणि या सगळ्यात तुम्ही स्वत: कोण आहात हे सहज विसरलं जातं."
तो पुढे म्हणाला, "स्वत:ची मूल्ये जपणं, कुटुंबाशी-जवळच्या मित्रपरिवाराशी जोडलं राहणं या गोष्टींनी मला कायमच जमिनीवर ठेवलं. शेवटी स्वतःशी प्रामाणिक राहणे हाच यश आणि आनंद टिकवून ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे."
शाहिद कपूर एक चांगला पिताही आहे. त्याला मिशा आणि झेन ही दोन मुलं आहेत. शाहिदचं स्टारडम पाहून मुलांना काय वाटतं असं विचारलं असता शाहिद म्हणाला, "मला त्यांना शक्य तितकं अगदी सामान्य मुलांसारखं वाढवायचं आहे. पण शेवटी जे आहे ते आहे. मुलं जशी जशी मोठी होत आहेत त्यांना सगळं कळायला लागलं आहे. पण आम्ही त्यांना स्टारडम वगैरे विषयी काही सांगत नाही. त्यांनी काही विचारलंच तर सामान्य पालकांप्रमाणेच आम्ही त्यांना साधं सरळ उत्तर देतो. बस, इतकंच. हे असं आहे."