"बॉलिवूडमध्ये आता चांगले सिनेमे बनतच नाहीयेत...", प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; प्रेक्षकांना म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:00 IST2026-01-31T18:00:26+5:302026-01-31T18:00:36+5:30
कोण आहे हा अभिनेता? फेक मार्केटविषयावरही बोलला

"बॉलिवूडमध्ये आता चांगले सिनेमे बनतच नाहीयेत...", प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; प्रेक्षकांना म्हणाला...
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक सिनेमे येतात. मात्र प्रत्येकच सिनेमा चालतो असं नाही. कोरोना काळानंतर अनेक हिंदी सिनेमे आपटले. पण आता बॉलिवूड पुन्हा हळूहळू सावरतंय. प्रेक्षकांना चांगलं काहीतरी बघायचं आहे त्यामुळे मेकर्सलाही तसाच कंटेंट आणायचा आहे. प्रेक्षक चोखंदळ झाले आहेत. दरम्यान एका अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये सध्या चांगले सिनेमे बनत नाहीयेत असं वक्तव्य केलंय. कोण आहे तो?
आगामी 'ओ रोमिओ' सिनेमात दिसणारा शाहिद कपूर सध्या चर्चेत आहे. करिअरच्या सुरुवातीला चॉकलेट बॉय म्हणून शाहिदीला ओळख मिळाली होती. आजवर त्याने विविधांगी भूमिका केलेले सिनेमे दिले. नुकतंच एका मुलाखतीत तो म्हणाला, "मला वाटतं मेणबत्ती दोन्ही बाजूने जळते. प्रेक्षकही त्यांचा संयम हरवत चालले आहेत. त्यांचं लक्ष एकावर केंद्रित होत नाहीये. त्यांना स्टिम्युलेशन हवं आहे, त्यांना ब्रेक हवा. कारण ही डोपामाइन हिट आहे. क्रिएटर्सही आपल्यासोबत हेच करत आहेत. प्रेक्षकांना सिनेमे पाहायचे नाहीत असं नाही पण आता आपण इतके चांगले चित्रपट बनवत नाही आहोत जितके बनवायला हवे. ही दोन्ही बाजूंनी चालणारी प्रक्रिया आहे."
शाहिदने एका आव्हानाबद्दल भाष्य केले आहे जे गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीला सतावत आहे ते म्हणजे बनावट मार्केटिंग. तो म्हणाला, "लोकांना समजत नाही, पण हा आयुष्यातील एक चमत्कार आहे की लोकांनी भरलेलं एखादं सभागृह खरोखर टाळ्या वाजवतंय, शिट्ट्या मारतंय आणि तुम्हाला ती ओळख मिळवून देतंय, तुम्हाला स्वतःपेक्षा मोठे स्थान देतंय..ही खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणूनच कला खास असते. पण जेव्हा त्यात काहीतरी बनावट शिरते तेव्हा ते तसे नैसर्गिक वाटत नाही. मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला करावीच लागते— तुम्हालाही करावी लागते आणि मलाही. पण मार्केटिंग 'योग्य' आणि 'अयोग्य' मधील रेषा कधी ओलांडते? हे सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या नैतिकतेच्या जाणिवेवर अवलंबून असते. जर तुम्ही त्या भावनेतून काम करणे निवडले, तर ती गोष्ट वेगळी असते. पण जर तुम्ही फक्त व्यवसाय आणि आकड्यांसाठी काम करत असाल तर शेवटी ते फक्त व्यवसाय आणि आकडेच राहतात."