"मुंबईसारख्या शहरात असं...", सैफसोबतच्या घटनेनंतर शाहीद कपूरने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:15 IST2025-01-17T15:15:36+5:302025-01-17T15:15:58+5:30
आपल्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी शाहीद कपूर माध्यमांनी सैफसोबतच्या घटनेवर प्रश्न विचारला.

"मुंबईसारख्या शहरात असं...", सैफसोबतच्या घटनेनंतर शाहीद कपूरने व्यक्त केली चिंता
अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात झालेल्या हल्ल्यानंतर सगळेच धक्क्यात आहेत. रात्री २ वाजण्याच्या सुमारास सर्व झोपलेले असताना एक अज्ञात थेट सैफच्या मुलांच्या खोलीत घुसला.तेव्हा खोलीत मुलांजवळ त्यांची नॅनीही होती. आरडाओरडा ऐकल्यानंतर सैफ धावत आला. त्याने हटकले असता चोराने सैफवरच चाकूने ६ वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला तर चोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर सर्वच हादरले आहेत. अनेकांनी प्रतिक्रियाही दिली आहे. नुकतंच शाहीद कपूरनेही (Shahid Kapoor) यावर भाष्य केलं आहे.
आपल्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी शाहीद कपूर माध्यमांनी सैफसोबतच्या घटनेवर प्रश्न विचारला. यावर तो म्हणाला,"खूपच दु:खद घटना आहे. आम्ही इंडस्ट्रीतील सर्वच लोक चिंतेत आहोत. सैफची तब्येत आता बरी असेल अशी मला आशा आहे. जे झालं त्यानंतर आपल्या सर्वांनाच धक्का बसला. मुंबईसारख्या शहरात आपल्या इतक्या पर्सनल स्पेसमध्ये असं होणं हे मान्य करणंच कठीण आहे. पोलिस पूर्ण प्रयत्न करत आहे. असं खरं तर होत नाही कधी कारण मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे. रात्री २-३ वाजताही एखादी महिला बाहेर असली तरी ती सुरक्षित असते हे आपण इतक्या अभिमानाने सांगतो. खूप धक्कादायक घटना आहे. त्याची तब्येत लवकरच बरी व्हावी. आपण सर्वच त्याच्यासाठी प्रार्थना करतच आहोत."
शाहीद कपूर आगामी 'देवा' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं ट्रेलर लाँच आज पार पडला. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता पूजा हेगडे दिसणार आहे. सिनेमाची स्टारकास्ट ट्रेलर लाँचला हजर होती. शाहीद आणि सैफने २०१७ साली 'रंगून' सिनेमात एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे शाहीद करिनाचा एक्स बॉयफ्रेंड आहे. दोघांचं अफेअर खूप गाजलं होतं.